हैदराबाद UGC net result 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) उद्या, 18 ऑक्टोबर रोजी UGC NET परिक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थांना ugcnet.nta.ac.in वर UGC NET 2024 निकाल पहाता येणार आहे. UGC NET 2024 चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडं त्यांच्या लॉगिनची माहिती असायला हवी. निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडं तुमचा परिक्षेचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल नंबर आवश्यक असतो. याबात NTA नं त्यांच्या अधिकृत X खात्यावर निकालाची तारीख माहिती दिलीय.
NTA will declare the Result of UGC NET June 2024 by 18th october 2024.
— National Testing Agency (@NTA_Exams) October 17, 2024
अडचण असल्यास NTA कडं तक्रार करा : उमेदवारांनी त्यांच्या निकालावरील खालील माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. त्यांना माहितीत काही तफावत आढळल्यास, त्यांनी NTA शी संपर्क साधवा. यात उमेदवाराचं नाव, अर्ज क्रमांक, जन्मतारीख, श्रेणी, छायाचित्र, वडिलांचं नाव, लिंग, स्वाक्षरी, मिळालेले गुण, अर्ज केलेला UGC NET विषय यासारख्या माहितीत बदल असल्यास त्यांनी NTA कडं तत्काळ तक्रार करावी.
किमान 40 टक्के गुण आवश्यक : अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांनी UGC NET परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे, तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. UGC NET जून परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. त्यामुळं विद्यार्थी UGC NET निकाल 2024 ची आतुरतेनं वाट होते. त्यातचं आज NTA नं UGC NET परिक्षा निकालाच्या तारखेची घोषणा केलीय.
कसा पाहणार निकाल : UGC NET परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला NTA च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
- अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर जा
- मुख्यपृष्ठावरील UGC NET निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, तिथं विद्यार्थ्यांनी त्यांची जन्मतारीख, अर्ज क्रमांक टाकावा.
- त्यानंतर तुम्हाला UGC NET 2024 परिक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी UGC NET 2024 परिक्षाचा निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढावी. जी तुम्हाला नंतर उपयोगी पडेल.
हे वाचलंत का :