मुंबई - अभिनेत्री राधिका आपटे आणि तिचा ब्रिटिश पती आणि व्हायोलिन वादक बेनेडिक्ट टेलर यांच्या घरी पाळणा हालणार आहे. ब्रिटीश फिल्म इन्स्टीट्यूट ( BFI ) च्या लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर राधिकानं पाऊल ठेवलं तेव्हा चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी मिळाली. राधिकानं तिच्या 'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती, त्यावेळी तिनं एका सुंदर काळ्या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप दाखवला.
'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटाचं स्क्रिनिंग 16 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलं. यामध्ये राधिका आपल्या स्टाईलमध्ये आत्मविश्वासानं वावरली. लग्नाला 12 वर्षे झाल्यानंतर तिचा आई होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. तिनं सोशल मीडियावर इव्हेंटमधील सुंदर फोटो शेअर करताना, "सिस्टर मिडनाइट यूके प्रीमियर #lff2024" असं पोस्टला कॅप्शन दिलं. तिच्या चित्रपटातील कलाकार आणि क्रू बरोबर तिनं दिलेल्या आकर्षक पोझ फोटोत दिसल्या. यामुळे प्रेक्षक प्रभावित झाले आहेत.
राधिकानं चकचकीत ऑफ-शोल्डर मिडी ड्रेसची केलेली निवड तिच्या प्रेग्नंसीसाठी परफेक्ट होती. तिच्या या फोटोंना चाहत्यांचा आणि चित्रपट उद्योगातील सहकाऱ्यांचा प्रतिसाद जबरदस्त होता. अनेकांनी त्यांचा आनंद व्यक्त करत अभिनंदन केलं. चित्रपट निर्मात्या झोया अख्तर, गुनीत मोंगा, अभिनेती विजय वर्मा, मृणाल ठाकूर आणि इतरांनी राधिकाला तिच्या आयुष्यातील मातृत्वाच्या या सुंदर टप्प्याला सुरुवात करताना तिचं अभिनंदन केलं.
राधिका आणि बेनेडिक्ट हे जोडपं 2011 मध्ये त्यांच्या भेटीपासून एकत्र आहेत. दोघांनी फारसा गाजावाजा न करता 2012 मध्ये विवाह केला होता. मुंबई आणि लंडनमध्ये फिरताना दोघेही अतिशय साधेपणानं वागताना दिसतात. ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनात कायम लक्षात राहणारी आहे.
कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं तर, राधिका आपटे तिच्या अष्टपैलू भूमिकांनी प्रभावित करत आहे. 'मेरी ख्रिसमस'मध्ये ती शेवटची कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्याबरोबर एका खास भूमिकेत दिसली होती. आगामी 'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटात राधिका, हामसाशी फुजीमोटो आणि डेमियन ग्रीव्हज यांच्याबरोबर काम करत असून हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. करण कंधारी दिग्दर्शित या विनोदी विनोदी चित्रपटाचा, या वर्षाच्या सुरुवातीला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाला होता.
'सिस्टर मिडनाईट' व्यतिरिक्त, राधिका यशराज फिल्म्ल एंटरटेनमेंट निर्मित, कीथी सुरेश बरोबर, अक्का या रिव्हेंज थ्रिलर मालिकेत दिसणार आहे. 'शोर इन द सिटी', 'अंधाधुन' आणि 'लस्ट स्टोरीज' यांसारख्या चित्रपटांमध्ये अत्तम अभिनय केलेली राधिका आपटे हिनं भारतीय सिनेसृष्टीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.