ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'मध्ये 'ॲनिमल' स्टारनं केली एन्ट्री, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात होईल धमाका - SAURABH SACHDEVA

'पुष्पा 2'मध्ये 'ॲनिमल' स्टारची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटामध्ये त्यानं बॉबी देओलबरोबर खलनायकाची भूमिका केली होती. आता तो 'पुष्पा 2'मध्ये धमाकेदार अंदाजत दिसणार आहे.

pushpa 2
पुष्पा 2 (अल्लू अर्जुनची 'पुष्पा 2' (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 17, 2024, 3:02 PM IST

मुंबई : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2- द रुल' चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होत आहे. अल्लू अर्जुन आणि चित्रपटाची संपूर्ण टीम अजूनही चित्रपटाच्या काही दृश्यांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. दिग्दर्शक सुकुमार 'पुष्पा 2'चे शूटिंग नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहेत. दरम्यान 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल एक अपडेट आली आहे. 2023 च्या मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'मधील एका अभिनेत्यानं 'पुष्पा 2'मध्ये एन्ट्री केली आहे. बॉबी देओल, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'ॲनिमल' चित्रपटात खलनायकाची भूमिका त्यानं साकारली होती.

'पुष्पा 2'मध्ये 'ॲनिमल' कलाकाराची एन्ट्री : आता साऊथ अभिनेता ब्रह्मानं 'पुष्पा 2' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात 'पुष्पा 2'चे दिग्दर्शक सुकुमार, ब्रह्मा, फहद फासिल आणि 'ॲनिमल' अभिनेता सौरभ सचदेवा दिसत आहेत. हे सर्व एकाच गाडीत आहेत. कार 'पुष्पा 2'चा खलनायक 'भंवर सिंग शेखावत' फहाद चालवत आहे. 'पुष्पा 2'मधील रोमांचक एंट्री सौरभ सचदेवाची असणार असल्याचं बोललं जात आहे. 'ॲनिमल' चित्रपटात सौरभ सचदेवानं बॉबी देओलच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. सौरभला 'ॲनिमल' चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली.

'पुष्पा 2' कधी प्रदर्शित होणार? : अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'चं नवीन पोस्टर आज 17 ऑक्टोबर रोजी समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टर शेअर केले आहे, यात म्हटलंय की, 'प्रतीक्षा ही कमी होत आहे, आता पुष्पराज आणि त्याचा ब्लॉकबस्टर, 'पुष्पा 2' रिलीज होण्यासाठी फक्त 50 दिवस उरले आहेत, 6 डिसेंबरपासून थिएटरवर राज्य करेल, 'पुष्पा 2.' आता या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहते अल्लू अर्जूनच्या या पोस्टरवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'देवरा पार्ट 1' पाहताना थिएटरमध्ये 'पुष्पा 2'चा टीझर पाहिल्यावर चाहते झाले उत्साहित, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2 teaser
  2. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा-2'मधील 'अंगारों' गाण्यावर दोन चिमुकल्यांनी केला डान्स, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2
  3. 'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजला 100 दिवस बाकी, अल्लू अर्जुनचं नवीन पोस्टर व्हायरल - Allu Arjun New Poster

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.