महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

लग्नात गौरी खानसह नातेवाईक रडल्यानंतर, शाहरुखनं म्हटलं- 'तू इथेच थांब, मी अधून मधून येत जाईन' - SRK GAURI WEDDING ANNIVERSARY

गौरी खान आणि शाहरुख खानच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे या जोडप्याला आता अनेकजण शुभेच्छा देत आहेत.

shah rukh khan
शाहरुख खान (शाहरुख खान आणि गौरी खानच्या लग्नाचा वाढदिवस (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 25, 2024, 12:20 PM IST

मुंबई :बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान आज 25 ऑक्टोबर रोजी खास दिवस साजरा करत आहे. आज शाहरुख खान आणि गौरी खान त्यांच्या लग्नाचा 33वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं शाहरुख खानचे चाहते त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एक्स हँडल आणि इंस्टाग्रामवर शाहरुख खानच्या फॅन पेजवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता या विशेष प्रसंगी शाहरुख खान आणि गौरी खानच्या लग्नाशी संबंधित एका खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. शाहरुख खानची सर्वात जवळीची मैत्रीण चित्रपट दिग्दर्शक-कोरिओग्राफर फराह खाननं काही वर्षापूर्वी तिच्या शोमध्ये संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केलं होतं.

शाहरुख खान आणि गौरी खानचा लग्नाचा वाढदिवस : यामध्ये शाहरुखच्या सासूचाही समावेश होता. फराह खाननं शाहरुख खानला विचारलं की, गौरीच्या निरोपाच्या दिवशी काय झाले?, यावर शाहरुख खान म्हणाला, "गौरी खानचे मामा विदाईच्या वेळी खूप रडले होते, गौरीही रडत होती आणि तिचे संपूर्ण कुटुंब रडत होते, हे सर्व पाहून मला खूप अपराधी असल्यासारख वाटत होतं. हे सर्व पाहून मी देखील भावूक झालो आणि मग मी म्हणालो, असं दिसतं आहे की, सर्वजण आनंदी नाहीत, गौरीला इथे ठेवा, मी दर आठवड्याला येईन." दरम्यान लग्नाच्या 6 वर्षानंतर शाहरुख खान आणि गौरी खानला आर्यन खानच्या रूपात मुलगा झाला. यानंतर तीन वर्षांनंतर 2000 मध्ये शाहरुख आणि गौरी खानच्या घरी सुहाना खानचा जन्म झाला. याशिवाय लग्नाच्या तेरा वर्षांनंतर 2013 मध्ये अबराम खान या छोट्या पाहुण्यानं शाहरुख-गौरीच्या घरी आगमन केलं.

शाहरुख खानचा वर्कफ्रंट : गेल्या वर्षी 2023 मध्ये शाहरुख खाननं 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिले आहेत, यातून शाहरुखनं एका वर्षात 2500 कोटींहून अधिक कमाई केली. असं करणारा शाहरुख भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव स्टार ठरला आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या मास ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'किंग'मुळे चर्चेत आहे. 'किंग' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केलं असून या चित्रपटात सुहाना खान देखील असणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान सेंस ऑफ ह्यूमर जबरदस्त, वाचा सुंदर विनोद
  2. हृतिक-रणबीरला मागे टाकून जगातील टॉप 10 देखण्या कलाकारांमध्ये शाहरुख खानच्या नावचा समावेश
  3. शाहरुख खानची मालिका 'फौजी'चा सीक्वल 35 वर्षांनंतर घोषित, मोशन पोस्टर रिलीज...

ABOUT THE AUTHOR

...view details