मुंबई - 2024 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अनेक कारणांनी संस्मरणीय ठरलं. या वर्षी अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, छोट्या बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला तर काही गाणीही खूप प्रसिद्ध झाली. पण दुसरीकडे, मनोरंजन विश्वात विविध पैलूंवर आपली छाप सोडणाऱ्या अनेक प्रसिद्ध आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांनाही आपण या वर्षी गमावलं आहे. त्यापैकी काही कलाकार होते, काही चित्रपट निर्माते तर काही संगीतकारही होते. या प्रतिभावान लोकांच्या जाण्यानं मनेरंजन विश्वात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. चला तर मग या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेणाऱ्या त्या महान आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणासाठी थोडा वेळ काढूया.
1. श्याम बेनेगल
प्रसिद्ध चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांचं अलीकडेच २३ डिसेंबर रोजी निधन झालं. 'मंथन', 'अंकुर', 'निशांत' असे अनेक अविस्मरणीय चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये पद्मभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार, 8 राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे.
जन्म- डिसेंबर १९३४
मृत्यू - डिसेंबर 2024
मृत्यूचे कारण: कथित किडनी समस्या
झाकीर हुसेन
प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचेही यंदाच्या अखेरच्या महिन्यात १५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झालं. 73 वर्षीय हुसेन यांचे सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं.
जन्म- मार्च १९५१
मृत्यू - डिसेंबर 2024
मृत्यूचे कारण - हृदयाशी संबंधित समस्या
सुहानी भटनागर
आमिर खानच्या 'दंगल'मध्ये बबिताची बालपणीची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागरचे निधन ही प्रेक्षकांसाठी धक्कादायक बातमी होती. सुहानी भटनागर यांचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं. 'दंगल' आला तेव्हा सुहानी फक्त 8 वर्षांची होती.
जन्म- 14 जून 2004
मृत्यू - 16 फेब्रुवारी 2024