मुंबई - 2025 ला सुरुवात झाली असून यावर्षी नव्या फिल्मी जोड्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. चालू वर्षात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी आणि हॉरर फिल्म्ससह तसेच अॅक्शन-अॅडव्हेंचर फिल्म्सचा समावेश असेल. यामध्ये एक नवीन गोष्ट म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत सेलेब्सच्या नव्या जोडी दिसणार आहेत. या विशेष लेखात आपण 2025 साली पडद्यावर दिसणाऱ्या अशा फ्रेश कपल्सबद्दल जाणून घेणार आहोत.
सलमान खान-रश्मिका मंदान्ना ((IANS)) सलमान खान-रश्मिका मंदान्ना
सर्वात पहिल्यांदा आपण 2025 मधील बॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित 'सिंकदर' चित्रपटाबद्दल जाणून गेणार आहोत. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान स्टारर चित्रपट 'सिकंदर' 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. या चित्रपटात सलमान खान आणि साऊथ ब्युटी रश्मिका मंदान्ना यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. सिकंदर हा मास अॅक्शन चित्रपट आहे.
हृतिक रोशन-कियारा अडवाणी ((IANS)) हृतिक रोशन-कियारा अडवाणी
बॉलीवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन 2025 साली त्याच्या मास अॅक्शन चित्रपट 'वॉर 2' सह बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालण्यासाठी तयार होत आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात हृतिक रोशनबरोबर कियारा अडवाणी दिसणार आहे. हृतिक आणि कियारा यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. याशिवाय या चित्रपटात हृतिक आणि साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.
आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान ((IANS)) आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान
अनुराग बसू दिग्दर्शित 'मेट्रो इन दिन' या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा पुन्हा पुढं ढकलली जात आहे. सारा अली खान या चित्रपटात 'आशिकी 2' फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरबरोबर दिसणार आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख, कोंकणा सेन, पंकज त्रिपाठी आणि अली फजल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना ((IANS)) विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना
त्याचबरोबर विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी 'छावा' या पीरियड ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी येशुबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर
अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरबरोबर 'परम सुंदरी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तुषार जलोटा या चित्रपटाचं दिग्दर्शक आहेत. हा एक क्रॉस-कल्चरल रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे, हा सिनेमा जुलै 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
शाहिद कपूर आणि पूजा हेगडे ((IANS)) शाहिद कपूर आणि पूजा हेगडे
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आणि साऊथ ब्युटी पूजा हेगडे ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'देवा' या चित्रपटात शाहिद-पूजाची जोडी दिसणार आहे. अॅक्शन-थ्रिलर चित्रपट देवा 31 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रोशन एंड्रयूजनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर ((IANS)) विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर
अनिल कपूरची भाची शनाया कपूरबद्दल असं बोललं जात होते की ती पहिल्यांदा करण जोहरच्या 'बेधडक' चित्रपटातून डेब्यू करणार आहे, पण हा चित्रपट रखडला होता. आता शनाया कपूर संतोष सिंगच्या 'आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट रस्किन बाँडच्या चित्रपटावर आधारित आहे. ही कथा द आय हॅव ईटनवर आधारित असून, या चित्रपटात शनाया '१२वी फेल' फेम अभिनेता विक्रांत मॅसीबरोबर दिसणार आहे.
जुनैद खान आणि खुशी कपूर ((IANS)) जुनैद खान आणि खुशी कपूर
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान यानं 'महाराज' या चित्रपटातून पदार्पण केल होतं. मात्र हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. आता त्याच्या 'लव्हयापा' या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर जुनैद खानसह दिसणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
आमन देवगण आणि राशा थडानी ((IANS)) आमन देवगण आणि राशा थडानी
अजय देवगणचा पुतण्या आमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. हे प्युअर फ्रेश कपल 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'आझाद' हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अजय देवगण आणि डायना पेंटी देखील या चित्रपटात दिसणार आहेत.
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही त्याच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या 'सरजमीन' आणि 'नादियां' या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे. 'नादानियां'बद्दल बोलायचं झाले तर तो श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरबरोबर दिसणार आहे.
धनुष आणि क्रिती सॅनन ((IANS)) धनुष आणि क्रिती सॅनन
तनु वेड्स मनू दिग्दर्शकाच्या 'तेरे इश्क' या चित्रपटात साऊथ स्टार धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात धनुषबरोबर बॉलिवूडची सर्वात सुंदर क्रिती सेनॉन दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यश- कियारा अडवाणी ((IANS)) यश- कियारा अडवाणी
कन्नड सुपरस्टार यश स्टारर मोस्ट अवेटेड अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्म 'यश' 10 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी टॉक्सिक या चित्रपटात यशबरोबर दिसणार आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस दोघेही कामासाठी एकत्र दिसले होते.
प्रभास - सई पल्लवी आणि मालविका मोहनन ((IANS)) प्रभास - सई पल्लवी आणि मालविका मोहनन
भारतीय चित्रपटसृष्टीचा 'बाहुबली' प्रभास स्टारर हॉरर-कॉमेडी चित्रपट 'द राजा साहेब' देखील 2025 मध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर सई पल्लवी आणि मालविका मोहनन पहिल्यांदाच दिसणार आहेत.