मुंबई Uorfi Javed :अभिनेत्री उर्फी जावेद सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फॉलो कर लो यार' या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. ही वेब सीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रिम होत आहे. आता अलीकडेच उर्फी ही आपल्या वेब सीरीजचं प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान उर्फी तिच्या वेब सीरीजचं अनोख्या पद्धतीनं प्रमोशन करताना दिसत आहे. तिनं सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींना मेसेज पाठवले आहेत. याशिवाय तिनं अनेकांना फॉलो करण्याची विनंती केली आहे. उर्फीनं शाहरुख खान प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, निक जोनास यांना मजेदार संदेश पाठवले आहेत. याचे स्क्रीनशॉट काढून तिनं पोस्ट देखील केले आहेत. आता यावर चाहत्यांकडून अनेक मजेदार कमेंट येत आहेत.
उर्फीनं केले स्क्रीनशॉट शेअर :उर्फीनं काव्यात्मक शैलीत सेलेब्सना संदेश पाठवले असून तिनं दिलजीत दोसांझला मेसेज करताना लिहिलं, "टेलिफोनची लांब तार, तू माझा आवडता सरदार, आता यावर 'फॉलो कर लो यार." कियाराला मेसेज करताना तिनं लिहिलं, "10 रुपयांची पेप्सी, तू सर्वात सेक्सी. आता यावर 'फॉलो कर लो यार." 'स्त्री 2'साठी श्रद्धाचं अभिनंदन करताना उर्फीनं लिहिलं, "नमस्कार श्रद्धा, 'स्त्री'साठी अभिनंदन, ॲमेझॉनचं सबस्क्रिप्शन फ्री नाही पण 'फॉलो कर लो यार." उर्फीनं शाहरुखबाबत कोणतीही कविता लिहिण्याऐवजी थेट त्याला फॉलो करण्याची विनंती केली. तिनं 'किंग खान'च्या पोस्टवर लिहिलं, "शाहरुख सर, 'फॉलो कर लो यार'. उर्फीनं आलिया भट्टला संदेश देत लिहिलं, "प्रत्येकाला यशाची संधी असते, आलिया सर्वात सुंदर दिसते. आता यावर 'फॉलो कर लो यार."