मुंबई :दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोनू सूदनं रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. 2022 मध्ये त्यानं अक्षय कुमारबरोबर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यानंतर तो हिंदी चित्रपटांमध्ये दिसला नाही. त्याचा 'सम्राट पृथ्वीराज' शेवटचा हिंदी चित्रपट होता. आता तो 'फतेह'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसत आहे. त्याचा हा चित्रपट 10 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये त्यानं धोकादायक अॅक्शन सीन्स केले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरही लोकांना आवडला. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'फतेह' चित्रपटाचं तिकिट 99 रुपये ठेवण्यात आलं आहे. आता या चित्रपटाचं 99 रुपये तिकिट असून देखील, थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कमी जात आहे. 'फतेह' पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करू शकतो, हे जाणून घेऊया.
'फतेह' चित्रपटासाठी होत आहे सोनू सूदचं कौतुक : 'फतेह' चित्रपटाचं बजेट सुमारे 25 कोटी रुपये असल्याचं समजत आहे. या चित्रपटात दिग्दर्शन सोनू सूदनं केलं आहे. रुपेरी पडद्यावर 'फतेह'नं रिलीज होण्यापूर्वी फक्त काही लाख रुपयांची आगाऊ बुकिंग मिळवली होती. हा चित्रपट पाहणारे लोक आता सोशल मीडियाच्या माध्यामातून सोनू सूदचं कौतुक करत आहेत. आता रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. सध्या हिंदी बॉक्स ऑफिसवर 'फतेह'समोर कोणतेही मोठे आव्हान नाही. मात्र तेलुगूमधील 'पुष्पा 2' आणि 'गेम चेंजर' या चित्रपटाशी 'फतेह'ला स्पर्धा करवी लागेल.