मुंबई :अभिनेता फरहान अख्तरनं यावर्षी 4 सप्टेंबर रोजी युद्धावर आधारित चित्रपट '120 बहादूर'ची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली होती. आज 18 नोव्हेंबर रोजी '120 बहादूर'मधील फरहान अख्तरचं फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील युद्धावर आधारित असणार आहे. '120 बहादूर' या चित्रपटामध्ये फरहान अख्तर हा भारतीय सैनिकाच्या भूमिकेत असणार आहे. आता फरहान अख्तरनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर या चित्रपटामधील फर्स्ट लूक शेअर केले आहे. हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित होणार याबद्दल देखील माहिती समोर आली आहे. '120 बहादूर' या चित्रपटातील फरहान अख्तरचा फर्स्ट लूक खूप दमदार आहे. दरम्यान भारत-चीन युद्धाला 62 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं फरहाननं '120 बहादूर' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
'120 बहादूर'मधील फरहान अख्तरचं फर्स्ट लूक रिलीज : चित्रपटामधील फर्स्ट लूक शेअर करताना फरहाननं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, '62 वर्षांपूर्वी 18 नोव्हेंबर 1662 रोजी भारत आणि चीनमध्ये रेजांगला युद्ध झाले होते. यामध्ये 120 शूरवीरांनी, हजारो सैनिकांना टक्कर दिली होती. भारतीय जवानांच्या शौर्याची कहाणी इतिहासात त्यांच्या रक्तानं लिहिली आहे. या वीरांच्या सन्मानार्थ आम्ही मेजर शैतान सिंग यांच्या धैर्याला सलाम करतो, जे प्रतिकूल परिस्थितीत शत्रूसमोर खंबीरपणे उभे राहिले, त्यांची कहाणी सदैव आपल्या आठवणीत असेल. याशिवाय अहीर समाजाला विशेष सलाम, या युद्धात त्याच्या समाजामधील मुलांनी राष्ट्र रक्षासाठी अतुलनीय शौर्य दाखवले.'