मुंबई - Fardeen Khan :अभिनेता फरदीन खाननं पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची तयारी केली आहे. फरदीन बॉलिवूड कमबॅकसाठी त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. आता त्याचा सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्याचा नवीन लूक पाहून चाहतेही आश्चर्यचकित होत आहेत. आता 14 वर्षांनंतर फरदीन खान चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' या चित्रपटात फरदीन खान दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्टही समोर आली आहे. फरदीन खान शेवटी 'दुल्हा मिल गया' (2010) चित्रपटात दिसला होता.
'खेल खेल में'ची स्टारकास्ट : अक्षय कुमार आणि तापसी पन्नू स्टारर 'खेल-खेल में' चित्रपटात वाणी कपूर, आदित्य सील, पंजाबी गायक आणि अभिनेता एमी वर्क आणि प्रज्ञा जैस्वाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुदस्सर अझीझ यांनी केलं आहे. टी-सीरीजचे मालक भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशी सिन्हा आणि अजय राय हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. मात्र लवकरच या चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा केली जाणार अशी अपेक्षा केली जात आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता.