मुंबई Natasa Stankovic Ex Boyfriend : मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक त्यांच्या नात्यातील दुराव्यामुळे ते आजकाल खूप चर्चेत आहेत. 18 जुलै रोजी अधिकृतपणे त्यांनी वेगळं होण्याची घोषणा केली. विभक्त होण्याच्या एका महिन्यानंतर, हार्दिकबद्दल अफवा उडू लागल्या की तो एका ब्रिटीश गायिकेला डेट करत आहे. याशिवाय नताशाचा एक्स बॉयफ्रेंड देखील तिच्यावर खास पद्धतीनं प्रेमाचा वर्षाव करत आहे. हार्दिक पांड्यापूर्वी नताशा स्टॅनकोविच टीव्ही अभिनेता अली गोनीला डेट करत होती. रिपोर्ट्सनुसार अली आणि नताशानं 2014 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोघांनी एकमेकांना 4 वर्षे डेट केलं.
नताशाच्या पोस्टवर अलीची प्रतिक्रिया :एका रिॲलिटी शोदरम्यान अलीनं सांगितलं होतं की, ब्रेकअपनंतरही ते एकमेकांना भेटायचे. दोघंही 5 वर्षे एकत्र राहिले. एका शो दरम्यानच अलीनं अधिकृतपणे जाहीर केलं होतं की तो आणि नताशा आता वेगळे झाले आहेत. अलीनं त्यांच्या विभक्त होण्याचं कारण म्हणून भिन्न धर्म आणि संस्कृतींचा उल्लेख केला होता. दरम्यान हार्दिक पांड्यापासून वेगळे झाल्यानंतर नताशा ही मुलगा अगस्त्यबरोबर सर्बियामध्ये आहे. नताशा इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच तिनं सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना नताशानं "ग्लॅम अॅन्ड गो" कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.