महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - EMERGENCY MOVIE TRAILER

कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

emergency movie trailer 2
'इमर्जन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर ('इमर्जन्सी' (Screen Shot Youtube Trailer))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 6, 2025, 11:03 AM IST

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत स्टारर पॉलिटिकल ड्रामा 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट जवळ येत आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट चालू महिन्यात रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. अनेक विरोधानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता 'इमर्जन्सी'चा दुसरा ट्रेलर रिलीजच्या 10 दिवसांपूर्वी, म्हणजेच 6 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. कंगनानं यापूर्वी 2024 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज केला होता. यानंतर अनेक टीका या चित्रपटावर काही लोकांनी केल्या होत्या. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले होते.

'इमर्जन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर : आता कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 17 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये 1975मध्ये भारतावर लादल्या गेलेल्या आणीबाणीचा काळ दाखविण्यात आला आहे. या काळामध्ये काय घडले यावर 'इमर्जन्सी' हा चित्रपट आधारित आहे. दुसऱ्या ट्रेलरची सुरुवात अनुपम खेर यांच्या जयप्रकाश नायरनच्या भूमिकेपासून होते. ते तुरुंगातून तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहिताना यात दिसतात. या दृश्यानंतर, कंगना राणौत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या भूमिकेत प्रवेश करते. यानंतर गोळ्यांचा आवाज आणि पोलिसांची चकमक होताना दाखविण्यात आली आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल :पुढं ट्रेलमध्ये 1971चे युद्ध घोषित केले जाते आणि नंतर शत्रू आणि भारतीय सैन्य यांच्यातील युद्धाचे दृश्य दाखवले जाते. या चित्रपटामध्ये अभिनेता मिलिंद सोमण सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसत आहे. यानंतर ट्रेलरचा शेवट 'इंदिरा इज इंडिया'नं होते. या चित्रपटामध्ये, कंगना राणौत, अनुपम खेर मिलिंद सोमण व्यतिरिक्त सतीश कौशिक, श्रेयस तळपदे, महिला चौधरी आणि विशाक नायर यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः कंगना राणौतनं केलं आहे. कंगनाचे गेल्या 9 वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपट ठरत आहेत. आता तिला 'इमर्जन्सी' या चित्रपटाकडून आशा आहे. दरम्यान कंगना राणौतनं राजकारणात प्रवेश केला आहे. 2024मध्ये लोकसभा निवडणुकीत हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून तिनं भाजप उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली.

हेही वाचा :

  1. विकास बहल आणि कंगना राणौत 'क्वीन 2'साठी पुन्हा येणार एकत्र, 'इमर्जन्सी'च्या रिलीजपूर्वी झाली पुष्टी
  2. "महिलांचा अपमान करणाऱ्यांचा पराभव"; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला
  3. शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या डेब्यू सीरीजची झाली घोषणा, कंगना राणौतनं केलं कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details