नागपूर : नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूर शहरात लवकरच ट्रॉली इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार आहे. नागपूर महानगरपालिकेनं (एनएमसी) शाश्वत ऊर्जेच्या वापराशी सुसंगत राहण्यासाठी ट्रॉली इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निधीतून तयार केलेल्या या पायलट प्रकल्पाच्या निविदा पुढील महिन्यात जारी केल्या जातील.
नागपूरच्या रिंग रोडवर चाचणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये वारंवार अधोरेखित केलेला हा प्रकल्प आता अधिकृतपणे सुरू होण्यास सज्ज आहे. ट्रॉली-इलेक्ट्रिक बसेस इनर रिंग रोडच्या 52 किमीच्या रोडवर काटोल नाका, एमआयडीसी, हिंगणा टी-पॉइंट, छत्रपती स्क्वेअर, कलामना आणि कंपटी रोड सारख्या मार्गांवर धावतील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यापूर्वी 2024 मध्ये म्हणाले होते की, तीन परस्पर जोडलेल्या युनिट्स असलेल्या इलेक्ट्रिक बसेसची सध्या नागपूरच्या रिंग रोडवर चाचणी सुरू आहे. या बस लवकरच रोडवर धावतील. महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पासाठी 150 कोटी रुपये मंजूर केले आहे. 2023 मध्ये स्कोडा यांनी चेक प्रजासत्ताकातील प्राग येथे विकसित केलेल्या 24 मीटर लांबीच्या जगातील सर्वात लांब ओव्हरहेड पॉवर इलेक्ट्रिक ट्रॉली बसची चाचणी घेतली होती.
प्रकल्पाचे ठळक मुद्दे :
- हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. या प्रकल्पामुळं शहरी वाहतुकीत क्रांती घडवून आणण्याचा सरकारचा उद्देश आहे.
- प्रत्येक ट्रॉली ई-बसमध्ये 132 प्रवाशांची बसण्याची क्षमता असेल.
- डिझेल बसच्या तुलनेत, या बसचे भाडे 30% स्वस्त असण्याची असण्याची शक्यता आहे.
- पूर्णपणे वातानुकूलित बसेसमध्ये प्रत्येक सीटवर सीसीटीव्ही, पॅकेज केलेले अन्न असेल.
- या बसेसमध्ये एक नाविन्यपूर्ण वायरलेस चार्जिंग सिस्टम देखील आहे, जी एका मिनिटात वाहनं रिचार्ज करते.
हे वाचलंत का :