महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जेलमधून सुटल्यानंतर 22 दिवसांनी एल्विश यादवनं खरेदी केली करोडोंची आलिशान कार, पाहा व्हिडिओ - Elvish Yadav - ELVISH YADAV

Elvish Yadav: एल्विशनं कोट्यवधी रुपयांची मर्सिडीज कार खरेदी केली आहे. आता त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या मर्सिडीजची चाहत्यांना झलक दाखवली आहे.

Elvish Yadav
एल्विश यादव

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 12:53 PM IST

मुंबई- Elvish Yadav: बिग बॉस ओटीटीचा विजेता, प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला अलीकडेच सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. यापूर्वी तो एक युट्यूबरला मारहाण केल्यामुळे चर्चेत आला होता. आता एल्विशनं एक सुंदर कोट्यवधी रुपयांची चमकणारी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. त्यानं सोशल मीडियावर चाहत्यांना त्याच्या नवीन कारची झलक दाखवली आहे. एल्विशनं त्याच्या यूट्यूब अकाउंटवर त्याच्या नवीन कार मर्सिडीज जी वॅगनचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो कारच्या आत बसला आहे. याशिवाय तो या कारचे देखील वैशिष्ट्ये सांगत आहे. त्याच्याबरोबर त्याचे काही मित्र देखील व्हिडिओत दिसत आहे.

एल्विशनं खरेदी केली मर्सिडीज :ही कार चालवत असताना एल्विशनं आपल्या आईला फोन करून कार विकत घेतल्याचं सांगितलं. यानंतर तो त्याच्या घरी कार घेऊन गेला. मर्सिडीज जी वॅगनची किंमत 3.07 कोटी रुपये आहे. एल्विशची कार आता अनेकांना आवडत आहे. अनेकजण त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओला लाईक करत आहेत. याशिवाय काहीजण त्याच्या प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. एल्विशला कारचा खूप केझ आहे. तो अनेकदा त्याच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन कार चाहत्यांना दाखवत असतो. एल्विशनं शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितलं की, त्याला हीच कार घ्यायची होती, पण त्यावेळी ही उपलब्ध नव्हती.

22 दिवसांपूर्वी एल्विशची सुटका :तुरुंगातून सुटल्यानंतर 22 दिवसांनी एल्विशनं ही कार खरेदी केली. सापाच्या विषाच्या तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. एल्विशविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशनं त्याच्या गुन्ह्याची कबुली देखील दिली होती. एक आठवडा तुरुंगात राहिल्यानंतर, एल्विशला 50,000 रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी एका म्युझिक अल्बममध्ये उर्वशी रौतेलाबरोबर दिसला होता.

हेही वाचा :

  1. सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर रणदीप हुड्डानं शेअर केली पोस्ट - randeep hooda
  2. ईडन गार्डन्सवर दिसली किंग खान शाहरुखची जादू! अबराम, सुहाना आणि अनन्या पांडेसह साजरा केला केकेआरचा विजय - Shah Rukh Khan
  3. आलिया भट्टनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त शेअर केला पती रणबीर कपूरबरोबरचा फोटो, पाहा पोस्ट - ALIA RANBIR WEDDING ANNIVERSARY

ABOUT THE AUTHOR

...view details