मुंबई -Do Aur Do Pyaar Screening: हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री विद्या बालन स्टारर 'दो और दो प्यार' 19 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी 17 एप्रिल रोजी एका विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये चित्रपटसृष्टीमधील अनेक प्रसिद्ध स्टार्सनं हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी साऊथ अभिनेत्री श्रिया सरनही या कार्यक्रमात दिसली. हॉलमध्ये जात असताना, श्रियाला एक वृद्ध महिला भेटली, जी तिच्या ड्रेसबद्दल बोलताना दिसली. आता पापाराझीनं त्याच्या इंस्टाग्रामवर श्रिया सरनचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे. श्रियानं यावेळी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती खूप देखणी दिसत होती.
'दो और दो प्यार' स्क्रिनिंग : व्हिडिओमध्ये श्रिया या वृद्ध महिलेबरोबर उभी असल्याची दिसत आहे. तिला पापाराझींनी वेढलेले पाहून ती महिला म्हणते, 'मुलीला आधीच गरमी लागत आणि तिनं कपडे पण असे घातले आहेत. गरमी तर वाटेलचं ना.' वृद्ध महिलेचं बोलणं ऐकून श्रिया जोरात हसली. यानंतर महिलेनं तिला आत जाण्यास सांगितलं. या महिलेनं फक्त श्रियाचीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची भेट घेतली. तिनं अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर एक खास भेट घेऊन काही सुंदर फोटो क्लिक करण्यास सांगितले. यावेळी कार्तिक हा काळ्या टी-शर्टवर खूप सुंदर दिसत होता. यानंतर या वृद्ध महिलेनं अभिनेता शालिन भानोतची भेट घेतली. शालिन जेव्हा पापाराझीला फोटोसाठी पोझ देत होता, त्यावेळी ती महिला त्याच्याकडे आली आणि त्याला मिठी मारली. यानंतर दोघेही हसत-बोलत दिसले.