महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दिशा पटानीनं शेअर केले इटलीतील 'कल्की 2898 AD' च्या शूटिंगचे प्रभास बरोबरचे फोटो - Disha Patani Photo - DISHA PATANI PHOTO

Disha Patani Photo : दिशा पटानी आणि प्रभास सध्या त्यांच्या आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतले आहेत. दिशाने त्यांच्या इटलीतील शूटिंग शेड्यूलच्या काही झलक शेअर केल्या, ज्यामध्ये प्रभास देखील दिसत आहे.

Disha Patani  Photo
प्रभास आणि दिशा पटानी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 2:45 PM IST

मुंबई- Disha Patani Photo : अभिनेता प्रभास आणि दिशा पटानी सध्या इटलीमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित 'कल्की 2898 AD' या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या दिशानं तिच्या शूट शेड्यूलमधील काही झलक दाखवल्या आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट पूर्णत्वाकडे जात असून दिशा आणि प्रभास इटलीमध्ये एका रोमँटिक गाण्याचं शूटिंग करत आहेत.

तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर झलक शेअर करताना दिशानं लिहिलं: "इटलीतील फोटो डंप.. कल्की 2898 एडीमधील हे फोटो आहेत." फोटो आणि व्हिडिओच्या स्ट्रिंगमधील पहिल्या दोन फोटोमध्ये, दिशा संपूर्ण अंगाभोवती वस्त्र गुंडाळलेली दिसत आहे. हे फोटो शूटिंग लोकेशनचे आहेत, ज्यामध्ये दिशा चित्रपटाच्या क्रूने घेरलेली दिसत आहे. दुसऱ्या फोटोत, बाहुबली स्टार प्रभाससोबत पोज देताना दिसत आहे. तो त्याच्या व्हॅनमधून कॅमेराकडे हसताना दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये, इटलीतील निळेशान पाण्याचं दर्शन होतं. दुसऱ्या सेल्फीमध्ये, दिशा तिच्या कुरळ्या केसांसह पांढऱ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.

'कल्की 2989 एडी' शूटमधील काही पडद्यामागील झलक अभिनेत्री दिशा पटानीनं शेअर करताच, अनेक सोशल मीडिया युजर्सनी चित्रपटाच्या अपेक्षेने हार्ट इमोजी टाकण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये धाव घेतली. 9 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामासह चित्रपटाचे शूटिंग एकाच वेळी केलं जात आहे. बहुतांश चित्रीकरण पूर्ण झालं असून फक्त काही गाणी आणि पॅचवर्क सीन बाकी आहेत.

'कल्कि 2898 एडी' चित्रपटात महाभारताच्या महाकाव्य घटनांपासून ते 2898 AD पर्यंतच्या अनेक सहस्त्रांचा दीर्घ प्रवास पाहायला मिळणार आहे. साऊथ सुपरस्टार कमल हासन गेल्या वर्षी जूनमध्ये कलाकारांमध्ये सामील झाला होता. दीपिका पदुकोणने तिच्या गर्भधारणेची घोषणा करण्यापूर्वी 2023 मध्ये तिच्या भागाचं शूट पूर्ण केलं आहे. 'कल्की 2898 AD' च्या सेटवर स्टंट करताना अमिताभ यांना दुखापत झाली होती. त्यांच्या बरगडीच्या कूर्चाला दुखापत झाल्यानंतर काही काळ विश्रांती घेतली आणि बरा झाल्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती.

हेही वाचा -

  1. पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'द गोट लाईफ' ऑस्कर पुरस्कार मिळवू शकेल, इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विश्वास - Prithviraj Sukumaran
  2. अल्लू अर्जुननं 'पुष्पा: द रुल'च्या म्यूझिक रेकॉर्डिंग स्टुडिओतील संगीतकार आणि दिग्दर्शकाबरोबरचा फोटो केला शेअर - Pushpa The Rule
  3. रश्मिका मंदान्नाचे सर्वोच्च सुपरहिट 10 चित्रपट, 'अ‍ॅनिमल' आणि 'गीता गोविंदम'ही नाहीत शीर्षस्थानी - Rashmika Mandanna Birthday

ABOUT THE AUTHOR

...view details