मुंबई - Rahul Vaidya Wedding Anniversary: गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार हे सर्वात लोकप्रिय जोडप्यापैकी एक आहेत. हे दोघेही त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा आनंद घेत असतात. दोघेही एकामेंकाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच दोघे अनंत आणि राधिका अंबानीच्या लग्नाच्या फंक्शनमध्येही दिसले होते. यावेळी राहुल वैद्यनं आपल्या डान्सनं सर्वांची मने जिंकली होती. काही महिन्यापूर्वी दोघेही एका मुलीचे पालक झाले आहेत. राहुल आणि दिशा आपल्या लेकीबरोबर बराच वेळ घालवतात. दरम्यान आज 16 जुलाई रोजी या जोडप्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
लग्नाचा वाढदिवस :हा खास प्रसंग सोडून राहुल वैद्य आपल्या कामावर परतला आहे. आता सोशल मीडियावर राहुल वैद्यचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये तो पापाराझींसमोर उभा असल्याचं दिसत आहे. पापाराझीनं राहुलचे काही फोटो क्लिक केले आहेत. दरम्यान, त्यांनी राहुलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पापाराझींनी यावेळी त्याला म्हटलं की, "दिशाजी यांनाही आमच्या वतीनं शुभेच्छा द्या." यावर उत्तर देताना राहुल म्हटलं, "आज कामावर येणे माझ्यासाठी खूप अवघड होतं. आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवशी सोडून कामावर येणं खूप कठीण आहे. मी माझ्या पत्नीला प्रेमानं समजावलं की, मी काम केले तर आगामी लग्नाचे वाढदिवस साजरा करत राहीन. त्यामुळेच मी इथे कठीण प्रसंगी इथे आलो आहे." यानंतर राहुल हा आभार मानून तिथून निघून गेला.