मुंबई -Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या प्रेग्नन्सीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच ती आणि तिचा पती रणवीर सिंग त्याच्या पहिल्या मुलाचं स्वागत करणार आहे. या जोडप्यानं फेब्रुवारी 2024 मध्ये जाहीर केलं होतं की ते यावर्षी सप्टेंबरमध्ये पालक होणार आहे. दरम्यान दीपिका ही सप्टेंबरमध्ये कोणत्या दिवशी मुलाला जन्म देईल, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानीनं अलीकडेच दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरीच्या तारखेबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती 28 सप्टेंबर रोजी आई होऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे.
दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट :दरम्यान रणवीर-दीपिकाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता सोशल मीडियावर दीपिकाच्या डिलिव्हरीच्या तारखेबद्दल चर्चा होत आहे. या तारखेचा संबंध अभिनेता रणबीर कपूरबरोबर असल्याचं काही चाहते, या पोस्टवर म्हणताना दिसत आहेत. या दिवशी रणबीरचादेखील वाढदिवस आहे. जेव्हापासून दीपिकाची डिलिव्हरीच्या तारीख समोर आली, तेव्हापासून सोशल मीडिया यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे, दीपिका कामापासून दूर आहे. ती आई होण्याचा खूप आनंद घेत आहे. अनेकदा ती आपल्या कुटुंबाबरोबर लंच आणि डिनरसाठी जाताना दिसते.