मुंबई - Dalljiet Kaur:टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरनं पती निखिल पटेल विरोधात एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी दलजीतनं मुंबईतील आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये पती निखिल पटेलविरोधात तक्रार दाखल करत विश्वासघाताचा आरोप केला आहे. केनियामध्ये राहणारा निखिल पटेल सध्या भारतात आहे. शुक्रवारी तो कथित गर्लफ्रेंडबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. दलजीत कौरनं आपल्या पतीवर कायदेशीर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिनं याआधीही निखिलवर कारवाई केली होती. यावर्षी जूनमध्ये, तिनं तिच्या पतीविरुद्ध नैरोबी सिटी कोर्टात धाव घेतली होती. यानंतर निखिल पटेलला दलजीत आणि तिच्या मुलाला केनियातील घरातून बाहेर काढण्यापासून स्टे ऑर्डर दिला होता.
दलजीत कौरनं केलं निखिल पटेलवर गंभीर आरोप :यापूर्वी निखिलनं दलजीतला कायदेशीर नोटीस पाठवून त्याच्यावर छळवणूक केल्याचा आरोप केला होता. एका मुलाखतीत निखिल पटेलनं सांगितलं की, "दलजीतच्या एका पोस्टमध्ये माझे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं, यानंतर अनेकांना वाटलं हे सर्व खर आहे, असा आरोप करणं हे चुकीचे होतं." दलजीत कौर आणि निखिल पटेलनं मार्च 2023 मध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या 10 महिन्यांनंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एका मुलाखतीत निखिलनेही मे महिन्यात त्यांच्या विभक्त झाल्याची पुष्टी केली होती. आता दलजीत सर्व काही सोडून केनियाहून भारतात परतला आहे.