ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर 70 लाखांची रोख जप्त - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारी 70 लाखांची रोख शिरपूर पोलिसांनी जप्त केली. ही रोख मध्यप्रदेशातील सेंधवा इथून आणली जात होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरेंनी दिली.

Maharashtra Assembly Election 2024
पकडण्यात आलेली रोख (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 8:58 AM IST

Updated : Nov 5, 2024, 11:49 AM IST

धुळे : विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधून जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात येत आहे. शिरपूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात येणाऱ्या एका वाहनातून रोख रक्कम वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर 70 लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी कारसह चौघांना ताब्यात घेतलं असून याबाबत पुढील चौकशी शिरपूर पोलीस करत आहेत.

Maharashtra Assembly Election 2024
पकडण्यात आलेली रोख (Reporter)

कारमध्ये आढळली 70 लाख रुपयांची रक्कम : महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर शिरपूर तालुका पोलीस वाहनांची तपासणी करत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इनोव्हा कार क्रमांक एमपी 09, डिएल 8618 आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर मध्यप्रदेशातील सेंधवाकडून शिरपूरकडं संशयितरित्या भरधाव वेगानं जात होती. सदर कारमध्ये रोकड रक्कम असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. त्याद्वारे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात 70 लाख रुपयांची रक्कम आढळली. एवढी मोठी रक्कम कशासाठी आणि कुठं जात होती, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. सांगवी चेकपोस्ट दरम्यान वाहनांची तपासणी सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कारसह रक्कम ताब्यात घेतली. निवडणुकीच्या दरम्यान एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळल्यानं खळबळ उडाली. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत. ही रक्कम कशासाठी कारमधून चालवली होती, हे लवकरच पोलीस तपासात उघडकीस येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक (Reporter)

चार संशयित पोलिसांच्या ताब्यात : ही कार पोलिसांनी थांबवली असता, त्यातून रोख रकमेसह चौघं वाहनात आढळून आले. संदीप चंद्रकांत पवार (वय 33 व्यवासाय चालक, रा. साक्री रोड धुळे ), तुषार शालीग्राम साळुंखे (वय 32, रा. साक्री रोड धुळे ), विजय चंद्रकांत कुलकर्णी (वय 37 व्यवसाय-व्यापार, रा. गोकुळधाम पार्क शहादा, नंदुरबार ) हे आढळून आले. शिरपूर तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांनी या कारवाईत पोलिसांनी इनोव्हा कारसह 500 रुपयांची 65 लाख रुपयांची रोख, 100 रुपयांच्या नोटांची 5 लाखांची रोख जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, संतोष पाटील, संदीप ठाकरे, शेखर बागुल, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्निल बांगर, मनोज पाटील यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
पकडण्यात आलेली रोख (Reporter)

हेही वाचा :

  1. निवडणुकीत पैसाच पैसा? कारमधून 10.8 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त
  2. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी जप्त केली 1 कोटी 32 लाख रुपयांची रोकड, 5 जण ताब्यात
  3. साताऱ्यातील टोलनाक्यावर १५ लाखांची रोकड, मशिन विक्री व्यवहारातील रक्कम असल्याचा व्यावसायिकाचा दावा

Last Updated : Nov 5, 2024, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.