ETV Bharat / state

अफजलखानाचा कोथळा काढलेली वाघनखं नागपूरला रवाना, साताऱ्यात पाच लाख शिवप्रेमींनी घेतलं दर्शन - WAGHNAKH NEWS

वाघनखांचा साताऱ्यातील मुक्काम संपला आहे. आता ही वाघनखं नागपुरच्या मध्यवर्ती संग्रहालयात पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

Source- Waghnakh in Maharashtra
संग्रहित-सातारा वस्तुसंग्रहालय वाघनखं प्रदर्शन (Source-IASN)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2025, 9:55 AM IST

Updated : Feb 3, 2025, 12:06 PM IST

सातारा - ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं गेली सात महिने साताऱ्यातील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. ही वाघनखं नागपूरला (waghnakh display in Nagpur) रवाना झाली आहेत.

वाघनखांचा साताऱ्यात सात महिने मुक्काम- अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून देशात आणण्यात (waghnakh in maharashtra) आली आहेत. नागरिकांना पाहता यावीत म्हणून १९ जुलै २०२४ पासून वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली होती. तेव्हापासून सुमारे पाच लाख शिवप्रेमींनी वाघनखांचं दर्शन घेतलं.

वाघनखं बंदोबस्तात नागपूरकडे रवाना- साताऱ्यातील संग्रहालयातून वाघनखं रविवारी सकाळी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयाकडे रवाना झाली. यावेळी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचे ब्रिटिश अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाचे विशेष पथक उपस्थित होते. वाघनखांचा हस्तांतरण सोहळा यावेळी पार पडला. वाघनखांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाघनखांचा नागपुरात सात महिने मुक्काम - साताऱ्यातील वाघनखांचं प्रदर्शन संपलं आहे. आता नागपुरातील शिवप्रेमींना ही वाघनखं पाहता येतील. पुरातत्व विभागाच्या नियोजनानुसार १ फेब्रुवारी ते २ ऑक्टोबरपर्यंत नागपूर, ३ ऑक्टोबर ते ३ मे २०२६ पर्यंत कोल्हापूर येथील संग्रहालयात ही वाघनखं पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.

वाघनखं इंग्लंडवरून देशात आणण्याचा निर्णय- छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये सातारा येथील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खानचा वध केला. त्यामुळे साताऱ्यात लोकांना पाहण्यासाठी वाघनखं ठेवण्यात आली आहेत. प्रतापगडचा विजय हा शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक मानलं जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असतानाच राज्य सरकारनं वाघनखं इंग्लंडवरून देशात आणण्याचा निर्णय घेतला. सामंजस्य करारानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वाघनखं नेता येणार नाहीत. त्यामुळे सरकारनं सातारा, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये लोकांसाठी पाहण्यासाठी वाघनखं ठेवण्याचा निर्णय घेतला.

साताऱ्यात अनेक सेलिब्रिटींनी दिली भेट- साताऱ्यात वाघनखं आणल्यानंतर देश-विदेशातील चार लाख नागरिकांनी संग्रहालयाला भेट दिली. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखसारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. शाळकरी मुलांसाठी खास दिवस राखीव ठेवण्यात आला होता. वाघनखं साताऱ्यात आणल्यानंतर वाघनखांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.

हेही वाचा-

  1. वाघनखे भारतात आणण्यास होत आहे उशीर; विरोधकांचा हल्लाबोल तर सत्ताधाऱ्यांचे सडेतोड उत्तर
  2. Waghnakh in Maharashtra : शिवरायांची 'वाघनखे' आणण्यासाठी मुनगंटीवार सोमवारी ब्रिटनला होणार रवाना; तीन वर्षांसाठी करार

Last Updated : Feb 3, 2025, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.