पर्थ PRSW vs BRHW WBBL 2024 Live Streaming : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीग 2024 चा 14 वा सामना आज म्हणजेच 05 नोव्हेंबर रोजी पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थच्या WACA स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Scorchers 🆚 Heat
— Perth Scorchers (@ScorchersBBL) November 5, 2024
WACA Ground 🏟️
First ball 5:10pm 🏏 #WBBL10 #MADETOUGH pic.twitter.com/P7h4GecdWn
दोन्ही संघांची कामगिरी कशी : पर्थ स्कॉचर्स महिला संघानं आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यात एक जिंकला आहे तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत पर्थ स्कॉचर्सचा तिसरा सामना ब्रिस्बेन हीटशी होत आहे. हा सामना जिंकून पर्थ स्कॉचर्सच्या नजरा 2 गुण मिळवण्यावर असतील. दुसरीकडे, ब्रिस्बेन हीट महिला संघानं आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यात दोन जिंकले आहेत तर एकात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ब्रिस्बेन हीट महिला संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. परणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला संघ आतापर्यंत एकूण 20 वेळा आमनेसामने आले आहे. ज्यात ब्रिस्बेन हीटचा वरचष्मा दिसत आहे. ब्रिस्बेन हीट महिला संघानं 12 सामने जिंकले आहेत. तर पर्थ स्कॉचर्स महिला संघानं 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळं ब्रिस्बेन हीट महिला संघ अधिक मजबूत दिसत आहे हे स्पष्ट झालं आहे.
The only wicketkeepers with 100+ dismissals in WBBL history!
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 5, 2024
See them face off tonight in Perth 🤜 🤛 #WBBL10 pic.twitter.com/suzaE4HHa2
दिग्गज भारतीय महिला खेळाडू दिसणार : WBBL च्या या 10व्या हंगामात, शिखा पांडे ब्रिस्बेन हीटकडून खेळत असताना, जेमिमाह रॉड्रिग्स देखील त्याच संघाचा एक भाग आहे. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना ॲडलेड स्ट्रायकर्स संघाचा भाग आहे. दीप्ती शर्मा आणि यास्तिका भाटिया मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळताना दिसतील, तर पर्थ स्कॉचर्सनं डेलन हेमलथा यांचा समावेश केला आहे.
पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला यांच्यातील महिला बिग बॅश लीग 2024 चा 14 वा सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
महिला बिग बॅश लीग 2024 मधील पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला यांच्यातील 14 वा सामना आज मंगळवार 05 नोव्हेंबर रोजी पर्थच्या WACA स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:40 वाजता होणार आहे.
पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला यांच्यातील महिला बिग बॅश लीग 2024 चा 14 वा सामना कुठं पहायचा?
महिला बिग बॅश लीग 2024 मधील पर्थ स्कॉचर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला यांच्यातील 14 वा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही डिन्सी+हॉटस्टार ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
पर्थ स्कॉचर्स महिला संघ : बेथ मुनी (विकेटकीपर), सोफी डेव्हाईन (कर्णधार), डेलन हेमलता, एमी जोन्स, मिकाएला हिंकले, क्लो पिपारो, अलाना किंग, क्लो एन्सवर्थ, एमी लुईस एडगर, लिली मिल्स, एबोनी हॉस्किन, मॅडी डार्क, कार्ली लीसॉन
ब्रिस्बेन हीट महिला संघ : जॉर्जिया रेडमायन (विकेटकीपर), जेस जोनासेन (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, लॉरा हॅरिस, चार्ली नॉट, नादिन डी क्लार्क, सिएना जिंजर, शिखा पांडे, ग्रेस पार्सन्स, निकोला हॅनकॉक, लुसी बोर्के, लिली बासिंगथवा.
हेही वाचा :