मुंबई- मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये डायमंड कारखान्याच्या मॅनेजरचा मृतदेह आढळला. पोलिसाच्या माहितीनुसार त्यानं अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवल्यानंतर 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
गुजरातमधील डायमंड कंपनीचा मॅनेजरचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. हॉटेलमध्ये मृत व्यक्तीच्यासोबत 14 वर्षाची मुलगी होती. तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल केला.
मुलीच्या आईनं काय केली तक्रार- पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार त्या मॅनेजरनं गुजरातमधून अल्पवयीन मुलीला सोबत आणले होते. त्याचा हॉटेलमध्ये शनिवारी मृत्यू झाला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले होते. मात्र, काही वेळानं त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार त्या मॅनेजरला हृदयविकाराचा झटका आला. अल्पवयीन मुलीच्या आईला माहिती मिळताच ती गुजरातमधून मुंबईत दाखल झाली. त्या मॅनेजरनं खोटे आश्वासन देत मुलीला मुंबईत आणल्याचा मुलीच्या आईनं दावा केला. या प्रकरणाचा डीबी मार्ग पोलीस स्टेशनमधील अधिकारी तपास करत आहेत.
काय आहे पोक्सो कायदा?- अल्पवयीन मुल आणि मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या विरोधात पोक्सो कायदा 2012 मध्ये लागू करण्यात आला. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. 16 वर्षांखालील मुलांवर अत्याचार तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात किमान शिक्षा 10 ते 20 वर्षांपर्यंत वाढवून जन्मठेप किंवा मृत्यूपर्यंत वाढविण्याची पोक्सा कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचाराला मुलगाही बळी पडू शकतो असे कायद्यात गृहित धरण्यात आले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीप्रमाणे पोक्सो अंतर्गत 2018 मध्ये 39, 827 प्रकरणे नोंदविली गेली होती. हे प्रमाण 2017 च्या तुलनेत 22 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 2015 पासून चार वर्षांत पीओसीएसओ अंतर्गत 14, 913 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तेव्हा नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या 167 टक्के किंवा 2.5 पटीहून अधिक वाढली आहेत. हे फक्त हिमनगाचे टोक आहे. विविध संस्थांच्या अभ्यासानुसार प्रत्यक्षात प्रकरणापैकी केवळ 3 ते 4 टक्के प्रकरणाचीच नोंद झाली आहे.
हेही वाचा-