वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पार्टीच्या नेत्या तथा उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या मैदानात आहेत. तर रिपब्लिकन पार्टीकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी मैदानात उतरले आहेत. कमला हॅरिस यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी मिनेसोटाचे गवर्नर टिम वाल्ज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जेडी वेंस हे आहेत. विशेष म्हणजे जेडी वेंस यांनी एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांना हिटलर म्हणून संबोधलं होतं. मात्र या निवडणुकीत ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर उपराष्ट्रध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहेत.
#WATCH | Washington, USA: On the US presidential election, Christian Caryl, an American journalist says, " it's very hard to tell (who will win). the polls have been, not really comforting to either side. it's still a very close race. i'm afraid we don't have a very clear picture… pic.twitter.com/EI0ije1VHQ
— ANI (@ANI) November 5, 2024
कोण होणार अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी आज मतदान होणार आहे. अमेरिकेत होत असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेमुळे तगडी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पार्टीकडून विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी केली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 21 जुलैला आपण राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर केवळ साडेतीन महिन्याच्या कालावधीत कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची तयारी केली आहे. तर दुसरीकडं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मागील वेळीच त्यांनी आपण व्हाईट हाऊस सोडायला नको होते, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यास या पदावर दुसऱ्यांदा बसणारे ते पहिले व्यक्ती होतील. तर कमला हॅरिस यांनी निवडणूक जिंकल्यास अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासातील त्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्यामुळे यावेळी अमेरिकेत होत असलेली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक मोठी रंजक ठरणार आहे.
#WATCH | USA: Security heightened in front of the Philly Art Museum in Philadelphia, Pennsylvania ahead of the rally of US Presidential candidate Kamala Harris and Tim Walz for the US Presidential Election 2024 scheduled to take place on November 5.
— ANI (@ANI) November 5, 2024
The elected US President will… pic.twitter.com/ZIdAGCSOFc
स्वींग स्टेट अमेरिकेत करणार उलटफेर : अमेरिकेतील मतदान प्रक्रिया भारतीय मतदान प्रक्रियेसारखी नाही. भारतात एकाचवेळी मतदान होऊन त्याची गणना करण्यात येते. मात्र अमेरिकेत प्रत्येक स्टेट आपली गणना करत असल्यानं मतदानाचा निकाल लागण्यास वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विशेष म्हणजे या स्टेटनुसार मतदान होत असल्यानं मतदानावर स्वींग स्टेटचा मोठा परिणाम जाणवतो. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वींग स्टेट मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. या स्टेटमध्ये पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन, अॅरिझोना आणि नेवाडा या स्टेटचा समावेश आहे. त्यामुळे काही स्टेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पसंती देण्यात येते, तर काही स्टेटमधून कमला हॅरिस आघाडी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र यावेळच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणतीच शक्यता वर्तवली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट मत राजकीय विश्लेषक आणि पत्रकार ख्रिस्तियन कॅरिल यांनी वृत्तसंस्थेला बोलताना व्यक्त केलं. दरम्यान आज मतदान होत असल्यानं रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या फ्लोरिडा या गृहराज्यात, तर कमला हॅरिस कॅलिफोर्नियामध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान तळ ठोकणार आहेत.
हेही वाचा :
- अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस; 'हे' चार मुद्दे आहेत महत्वाचे
- अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काय असेल अमेरिकेचं परराष्ट्र धोरण? डोनाल्ड ट्रम्प-कमला हॅरिस यांच्यातील धोरणात्मक फरक - US Foreign Policy
- भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या नव्या अध्यक्ष होणार? निवडणुकीतून माघार घेताच जो बायडेन यांचा पाठिंबा - US PRESIDENTIAL ELECTION