मुंबई Salman Khan and Atlee : अभिनेता सलमान खान आणि 'जवान' दिग्दर्शक ॲटली यांचा मेगा ॲक्शन चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा एक मेगा-बजेट पॅन इंडिया चित्रपट असून यात दोन हिरो असणार आहेत. सलमान खानशिवाय या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता कमल हासन ॲक्शन करताना दिसणार आहेत. सलमान आणि कमल हासन दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. गेल्यावर्षी सलमान आणि ॲटलीनं या चित्रपटाबाबत चर्चा केली होती. ॲटलीनं सलमानला या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं, यानंतर त्याला भाईजाननं चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट तयार करण्याची सूचना दिली होती.
सलमान खान आणि कमल हासन दिसणार एकत्र : ॲटलीच्या या चित्रपटामध्ये सलमाननं काम करण्यास होकार दिला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खाननंतर ॲटली बॉलिवूडच्या भाईजानबरोबर धमाका करण्यास सज्ज आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ॲटली कमल हासनच्या होकाराची वाट पाहात आहे. यानंतर तो चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू करणार आहे. कमल हासनबरोबर ॲटलीनं चित्रपट करण्याबाबत चर्चा केल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटात ॲक्शन, रोमान्स आणि कौटुंबिक गोष्टी देखील पाहायला मिळणार आहेत. ॲटली प्रेक्षकांसाठी नवीन स्क्रिप्ट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या प्रॉडक्शनची टाइमलाइन अद्याप निश्चित झालेली नाही, मात्र असं म्हटलं जात आहे की, ॲटली जानेवारी 2025 मध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरू करेल.