मुंबई - 29 नोव्हेंबर 2024 हा 'सिनेमा लव्हर्स डे' म्हणून साजरा केला जातो. आज भारतभरातील प्रेक्षक सिनेमा पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. या खास दिवशी पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलीस इंडिया, मिराज सिनेमा आणि मुव्ही मॅक्स सारख्या आघाडीच्या सिनेमा चेन असलेल्या थिएटर्समध्ये केवळ 99 रुपयात चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे सिने प्रेमींना नवीन चित्रपटांसह क्सासिक री-रिलीज चित्रपटाचा आनंद आज घेता येणार आहे.
मोठ्या पडद्यावरची जादू साजरी करण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे खेचण्याचा हा या दिवसाच्या मागचा उद्देश आहे. परवडणाऱ्या तिकीट किमती व्यतिरिक्त अनेक थिएटर्समध्ये स्नॅक्स आणि ड्रिंक्सवर कॉम्बो डील ऑफर मिळणार आहे. यामध्ये सिनेपोलिस इंडिया येथे पॉपकॉर्न आणि कोक ऑफरचा समावेश आहे.
मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आज वरील थिएटर्समध्ये सुरू असलेल्या चित्रपटांचा आनंद घेता येईल. यासाठी मुख्य आकर्षण असू शकतं 'रानटी' आणि 'फुलवंती' या चित्रपटांचं. याशिवाय 'धर्मरक्षक संभाजी महाराज' आणि 'लव्ह लग्न लोचा' हे चित्रपटही थिएटर्समध्ये आहेत. हे सर्व चित्रपट आजच्या दिवशी 99 रुपयाच्या तिकीटात पाहता येणार आहेत.
थ्रिलर आणि नाट्यमय चाहत्यांसाठी आजच्या दिवशी 'द साबरमती रिपोर्ट' हा विक्रांत मॅसी अभिनीत चित्रपट आज सिनेमा प्रेमी दिनाचे प्रमुख आकर्षण आहे. या चित्रपटाने, आता तिसऱ्या आठवड्यात, आधीच 39,000 आगाऊ तिकिटे विकली आहेत आणि चित्रपट पाहणाऱ्यांच्या हा एक महत्त्वाचा चित्रपट असू शकतो.
'भूल भुलैया 3' हा कार्तिक आर्यन अभिनीत लोकप्रिय हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीमधील नवीन बॉलिवूड चित्रपट 35,000 प्री-सेल तिकिटांसह प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. 'सिंघम अगेन' हा लोकप्रिय रोहित शेट्टी दिग्दर्शित कॉप युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. पाचव्या आठवड्यासाठी 26,000 तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
या आठवड्यात हिंदी सिनेम प्रेमींसाठी जुन्या चित्रपटांचा पुन्हा प्रदर्शन झाल्यानं हेही चित्रपट आजच्या दिवशी पाहता येणार आहेत. नव्या पिढीसाठी हे एक खास आकर्षण असू शकतं. यामध्ये 'बीवी नंबर 1' हा सलमान खान, करिश्मा कपूर आणि सुष्मिता सेन अभिनीत 1999 चा हिट कॉमेडी चित्रपट आता शुक्रवारी केवळ 99 रुपयांमध्ये चित्रपटगृहांमध्ये अनुभवता येईल. हा एक लाऊड-आऊट क्लासिक चित्रपट आहे जो चाहत्यांच्या पसंतीस उतरु शकतो.
'करण अर्जुन' हा शाहरुख खान आणि सलमान खान यांची प्रमुख भूमिका असलेला 1995 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट देखील उपलब्ध आहे. हा चित्रपट खिळवून ठेवणाऱ्या कथानकासाठी आणि अविस्मरणीय पात्रांसाठी ओळखला जातो. तुम्हाला आठवणींच्या जगात पुन्हा घेऊन जाणारा हा सिनेमा आजच्या दिवसाचं प्रमुख आकर्षण आहे.
याशिवाय, इतर उल्लेखनीय री-रिलीजमध्ये 'मिया बीवी राझी की करंगे पाजी', 'मिस यू', आणि 'बापू नी मंदा मेरा' यांचा समावेश आहे. हे चित्रपट तुलनेनं कमी प्रसिद्ध असले तरी, अनेक सिनेफिल्सच्या हृदयात एक विशेष स्थान आहे.
सिनेमा प्रेमी दिवस 2024 ही चित्रपटगृहांमध्ये तुम्ही गमावलेले चित्रपट पाहण्याची किंवा जुन्या आवडत्या चित्रपटांना पुन्हा भेट देण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही Moana 2 किंवा सिंघम अगेन सारख्या नवीन ब्लॉकबस्टर चित्रपट पाहण्याच्या मूडमध्ये असाल किंवा 'कल हो ना हो' किंवा 'करण अर्जुन' यांसारख्या बॉलीवूडमधील काही उत्कृष्ट क्लासिक गाण्यांना पुन्हा पाहायचं असेल तर आजच्या दिवशी एक उत्तम संधी आहे.