लॉस एंजेलिस - Oscar 2024 : क्रिस्टोफर नोलनच्या बायोग्राफिकल थ्रिलर चित्रपट 'ओपेनहायमर'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकून सिलियन मर्फीनं (cillian murphy ) एक इतिहास रचला आहे. ऑस्कर 2024 मध्ये 'ओपेनहायमर' (Oppenheimer Movie) चित्रपटानं सर्वाधिक ऑस्कर जिंकले आहेत. 'ओपेनहायमर' फेम स्टार सिलियन मर्फीनं पहिला ऑस्कर जिंकला आहे. ऑस्करच्या मंचावर, हातात ऑस्कर ट्रॉफी घेऊन, सिलियन मर्फीनं आपल्या भाषणामध्ये असं काही म्हटलं, ज्यामुळे आता अनेकजण त्याचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. सिलियन मर्फीनं आपल्या भाषणात 'ओपेनहायमर' चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांचे आभार मानले आहेत. (J Robert Oppenheimer)
सिलियन मर्फीनं मिळवला ऑस्कर :सिलियननं म्हटलं, ''क्रिस्टोफरनं त्याच्या या मोठ्या चित्रपटासाठी मला सक्षम मानले आणि मला एक उत्तम भूमिका करण्याची संधी दिली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी मी तुमचा आभारी आहे. हा पुरस्कार ओपेनहाइमरच्या संपूर्ण टीमला समर्पित आहे. हा आपल्या सर्वांचा विजय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मी हा पुरस्कार शांततेत जगण्याचा संदेश देणारे अणुबॉम्बचे जनक रॉबर्ट जे. ओपेनहायमर यांना समर्पित करतो. (Cillian dedicates J Oppenheimer) '' 'ओपेनहायमर' चित्रपटाला 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळालं होतं. या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंग, सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट अभिनेता सहाय्यक भूमिका या 7 श्रेणींमध्ये ऑस्कर जिंकलं आहे.