छतरपूर - Jubin Nautiyal Bageshwar Dham :गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक प्रसिद्ध व्यक्ती बागेश्वर धाममध्ये पोहोचल्या. यामध्ये प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल देखील एक आहे. बागेश्वर धाममध्ये पोहोचल्यानंतर जुबिन हा खूप आनंदी दिसत होता. त्यानं बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे यावेळी खूप कौतुक केले. जुबिननं म्हटलं की, "धामवर पोहोचून महाराजांचे दर्शन घेणं हे माझं भाग्य आहे, येथील सर्व काही माझ्या कल्पनेपेक्षाही भव्य आहे." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबासह धाममध्ये येऊ शकलो आणि महाराजांचा सहवास लाभला याचा मला खूप आनंद आहे. मला आशा आहे की माझे पुढचे दिवस खूप चांगले जातील. राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मी पहिल्यांदा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना भेटलो होतो, त्यावेळी त्यांच्याबरोबर बोलण्याची आणि भोजन करण्याची संधी मिळाली. महाराजांमध्ये खूप आपुलकी आहे, म्हणून ते बागेश्वरचे महाराज आहेत. आमच्या सारख्या तरुणांना ते प्रेरणा देतात आणि त्यांच्याकडून शिकायला खूप मिळाले."
जुबिन नौटियाल बागेश्वर धामला पोहोचला, घेतली बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट - jubin nautiyal - JUBIN NAUTIYAL
Jubin Nautiyal Bageshwar Dham : गुरुपौर्णिमेनिमित्त जुबिन नौटियाल हा बागेश्वर धामला आपल्या कुटुंबासह पोहचला. यानंतर त्यानं बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेतली.
![जुबिन नौटियाल बागेश्वर धामला पोहोचला, घेतली बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट - jubin nautiyal Jubin Nautiyal Bageshwar Dham](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-07-2024/1200-675-22024556-thumbnail-16x9-jubin-nautiyal-bageshwar-dham.jpg)
Published : Jul 23, 2024, 11:44 AM IST
गुरुपौर्णिमेचा सण:21 जुलै रोजी देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. हा दिवस सर्वांसाठी खूप विशेष आहे. या दिवशी अनेकजण आपल्या गुरुला भेटण्यासाठी किंवा त्यांना आदरांजली वाहत असतात. हिंदू धर्मात गुरूचे स्थान सर्वात विशेष मानले गेले आहे. लोक या सणाला आषाढी पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा या नावांनी देखील ओळखतात. या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेला शिष्य आपल्या गुरुंची पूजा करतात. जुबिन नौटियाल हा देखील कुटुंबासह बागेश्वर धामला पोहोचला होता. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची यापूर्वी देखील अनेक कलाकरांनी भेटले घेतली आहे.
जुबिन नौटियाल वर्कफ्रंट : बागेश्वर धाममध्ये जुबिननं भाविकांसाठी भजन म्हणून सर्वांना भक्तीत तल्लीन केलं. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये अनेक भक्त जुबिननं म्हटलेल्या भजनवर थिरकताना दिसत आहेत. दरम्यान जुबिन नौटियालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं बॉलिवूडमध्ये पहिले गाणं 'सोनाली केबल' (2014) मधील 'एक मुलाकात' गायलं होतं. यानंतर त्यानं आपला संघर्ष चालू ठेवला. त्याला 'बजरंगी भाईजान'मधील 'जिन्दगी कुछ तो बता ' हे गाणं गायलं, यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली.