मुंबई - Maharangini Queen of Queens :बॉलिवूड अभिनेत्री काजोलनं अनेक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तिनं तिच्या ३२ वर्षांच्या करिअरमध्ये चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, काजोलचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ती पुढं 'महारागिणी : क्वीन ऑफ क्वीन्स'मध्ये अॅक्शन अवतारामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन चरण तेज उप्पलपती करत आहे. सध्या कजोलचा हा चित्रपट खूप चर्चेत आहे. कजोलचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
काजोल दिसणार ॲक्शन अवतारात : चित्रपट दिग्दर्शक चरण तेज यांनी एका संवादादरम्यान म्हटलं, "काजोलनं चित्रपटाच्या सेटवर येण्यापूर्वी ॲक्शनसाठी खूप तयारी केली होती. तिन या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतील आहे. या चित्रपटात काजोल मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माया या महिलेची भूमिका साकाणार आहे. या झोपडपट्टीतून बाहेर पडून माया (काजोल) महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली महिला बनते. 'महारागणी : क्वीन ऑफ क्वीन्स' चित्रपटामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी खूप प्रेरणादायक असणार आहे.
'महारागणी : क्वीन ऑफ क्वीन्स' चित्रपटाची स्टार कास्ट : या चित्रपटाच्या कहाणीत मिडिल क्लास कुटुंबातील मुलांचे पालकांवर खूप प्रेम असते हे दाखण्यात आलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग गेल्या फेब्रुवारीत हैदराबादमध्ये झाले होते. 'महारागणी : क्वीन ऑफ क्वीन्स' चित्रपटामध्ये काजोलसह नसीरुद्दीन शाह, प्रभु देवा आणि जिसू सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक देखील असणार आहे. हिंदीबरोबर तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखली जात आहे. या चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलचे शूटिंग लवकरच मुंबईत सुरू होणार आहे. दरम्यान, कजोलच्या आगामी वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं ती 'दो पत्ती' या चित्रपटामध्ये अभिनेता शाहीर शेख आणि क्रिती सेनॉनबरोबर दिसणार आहे. काजोलचा हा आगमी चित्रपट सध्या खूप चर्चेत असून लवकरच या चित्रपटाबद्दल अपडेट चाहत्यांना पाहायला मिळेल.
हेही वाचा :
- जागतिक हास्य दिन साजरा करण्याची काजोलची खास पद्धत, केला मजेदार व्हिडिओ शेअर - world laughter day
- न्यासा देवगणच्या वाढदिवशी काजोलनं शेअर केले हृदयस्पर्शी क्षण - Nysa Devgan birthday
- काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज