मुंबई - Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा 5वा सीझन खूप चर्चेत आहेत. या शोचा आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. रोज बिग बॉसच्या घरात नवीन गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी 5'चा दुसरा भाऊचा धक्का (वीकेंड का वार) नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखनं जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी,अरबाज आणि वैभव या सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. रितेशनं जान्हवीला संपूर्ण घरावर दादागिरी करून अपशब्द वापरल्याबद्दल खडेबोल सुनावले. तसेच रितेशनं यावेळी काही सदस्यांचं कौतुक देखील केलं आहे. या शोमध्ये रितेशन सूरज चव्हाणला चांगला खेळून पुढं जाण्याचा सल्ला दिला.
रितेश देशमुखनं घेतली शाळा :शनिवारच्या भागात रितेशनं अरबाज, वैभव, जान्हवी, निक्की आणि घन:श्यामला त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल कानउघडणी केल्यानंतर आता सोशल मीडियावर अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. यानंतर दुसऱ्या ग्रुपच्या सदस्यांना गार्डन परिसरात पिकनिक बंद करा आणि खेळायला लागा असा सल्ला रितेशनं दिला आहे. यावेळी रितेशन योगिता चव्हाणचं कौतुक केलं, यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी तिनं आपल्या मनातली एक गोष्ट रितेशला सांगत तिनं संपूर्ण टीमची माफी मागितली. यानंतर ती म्हणते, "मला सगळे म्हणतात की, तू इथे कशाला आलीस, माझ्या चुका देखील मी मान्य करते. यानंतर रितेश सांगतो की, इथे कोण राहणार हे सर्व बिग बॉस ठरवतात."