मुंबई Bigg Boss Marathi 5 :'बिग बॉस मराठी 5'चा पाचवा सीझन दिवसेंदिवस रंगत आहे. बिग बॉसच्या घरात आता एक नवीन टास्क पाहायला मिळला. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये मारामारी आणि भांडणं देखील झाली. बिग बॉसच्या घरात निक्की ही सुरुवातीपासून आपली मनमानी करत आली आहे. घरामध्ये निक्कीचं अरबाजसोडून कोणाबरोबर पटलेलं नाही. दरम्यान कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये जोरदार वाद आणि मारामारी होताना दिसली. यावेळी आर्या जाधवनं निक्कीला कानशिलात लगावली. आता यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण गंभीर असल्याचं दिसत आहे. आर्यानं घरात असं कृत्य केल्यानंतर बिग बॉस तिला आज शिक्षा सुनावणार आहेत.
कॅप्टन्सीच्या टास्कदरम्यान झाली मारामारी : बिग बॉस निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये कॅप्टन्सीच्या टास्कदरम्यान सुरुवातीला निक्कीला थांबवण्यासाठी आर्या ही खूप प्रयत्न करताना दिसते. यानंतर दोघींमध्ये चांगलीच हातापायी होते. आर्यानं निक्कीच्या कानशिलात लगावल्यानंतर तिला अरबाज पटेल हा पाठिंबा देताना घरात दिसतो. याशिवाय घरातील बाकी सदस्यसुद्धा आर्याला दोषी ठरवतात. आर्याला शिक्षा सुनावत असल्याचा प्रोमो हा सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाला आहे. यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत. काही यूजर्स आर्याला पाठिंबा देत आहेत.