महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकरनं केला चाहत्यांना प्रश्न, होणाऱ्या पतीसह फोटो व्हायरल... - ANKITA WALAWALKAR WITH FIANCE

अंकिता वालावलकरनं होणाऱ्या पतीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं तिच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे.

Ankita Walawalkar
अंकिता वालावलकर (अंकिता वालावलकर - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 2:08 PM IST

मुंबई : 'बिग बॉस मराठी 5'मुळे अंकिता वालावलकर प्रसिद्धीझोतात आली. ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिला शोपासून सर्वत्र 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून एक नवीन ओळख मिळाली आहे. अंकिता ही 'बिग बॉस'मध्ये चाहत्यांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक होती. अंकिता 'बिग बॉस'च्या घरात असताना ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अंकितानं दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिच्या होणाऱ्या पतीबद्दल सांगितलं होतं. यानंतर ती लग्नबंधनात कधी अडकणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. आता अंकितानं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे फोटो शेअर केला आहेत.

बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरनं शेअर केला फोटो : या फोटोमध्ये ती आपल्या पतीबरोबर पोझ देताना दिसत आहे. अंकिताचा पती लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक असून त्याच नाव कुणाल भगत आहे. 'बिग बॉस मराठी 5'मधून बाहेर पडल्यानंतर अंकिता तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. आता अंकिता आणि कुणाल आता लवकरच लग्न करणार आहेत. दरम्यान अंकितानं शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'प्री-वेडिंग शूट करणं गरजेचं आहे का?' असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. आता यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता अलीकडच्या काळात लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा नवीन ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे अनेक जोडपे प्री-वेडिंग शूट करतात.

चाहत्यांनी केल्या कमेंट्स :आता या फोटोच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं लिहिलं, 'क्यूट जोडी.' दुसऱ्या एकानं लिहिल,'नक्की फोटोशूट करा.' आणखी एकानं लिहिलं, 'लवकर लग्न करून मोकळे व्हा.' याशिवाय अनेकजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यापूर्वी अंकिता ही 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणकडे बारामतीमधील तालुक्यात मोधावे गावी गेली होती. यानंतर ती चर्तेत आली होती. सूरजन यावेळी तिचं गावीमध्ये चांगल्या पद्धतीन स्वागत केलं होत. दरम्यान अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

ABOUT THE AUTHOR

...view details