मुंबई Bigg Boss 18 Contestants :अभिनेता सलमान खानचा हिट रिॲलिटी शो 'बिग बॉस'च्या आगामी सीझन 18 मधील स्पर्धक कोण असतील त्याचा खुलासा झाला आहे. हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. यावेळी या सीझनमध्ये कुठले स्टार्स दिसणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. हा शो ऑक्टोबरमध्ये प्रसारित होणार आहे. या सीझनमध्ये समीरा रेड्डी, निया शर्मा, शोएब इब्राहिम, पद्मिनी कोल्हापुरे, सुरभी ज्योती, करण वीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ यांच्यासह अनेक स्पर्धकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'बिग बॉस'च्या आगामी सीझनसाठी निश्चित झालेल्या स्पर्धकांची घोषणा करण्यात आली आहे. अलीकडे 'खतरों के खिलाडी सीझन 14'चा विजेता करण वीर मेहरा झाला आहे. तरीही तो या शोमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी छोट्या पडद्यावर येत आहे.
'बिग बॉस 18' दिसणार 'हे' स्पर्धक :याशिवाय, गश्मीर महाजनी, नायरा बॅनर्जी, मुस्कान बामणे आणि एलिस कौशिक हे स्टार्स देखील 'बिग बॉस 18' मध्ये झळकणार असल्याचं समजत आहे. आता या डायनॅमिक ग्रुपसह, प्रेक्षकांना शोमधील ड्रामा आणि मनोरंजन रोजचं पाहायला मिळेल. 'बिग बॉस 18'द्वारे सलमान खान या शोचा होस्ट म्हणून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. 'बिग बॉस 18'चा प्रीमियर 6 ऑक्टोबरला कलर्सवर होणार आहे. या शोमध्ये सलमान खान यावेळी जरा हटके अंदाजात दिसणार आहे. दरम्यान स्टॅन्डअप कॉमेडियन मुनावर फारुकी 'बिग बॉस 17'चा विजेता होता.