महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कॉमेडीचा शार्प शूटर भाऊ कदम 'सिरियल किलर' नाटकासह मनोरंजनासाठी सज्ज

Bhau Kadam starrer Serial Killer : भाऊ कदमची प्रमुख भूमिका असलेल्या 'सिरियल किलर' नाटकाचा १२ ऑक्टोबरला शुभारंभ होत आहे.

Bhau Kadam starrer drama 'Serial Killer'
भाऊ कदम 'सिरियल किलर' (Serial Killer PR team)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 7, 2024, 3:36 PM IST

मुंबई - अभिनेता भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्कं झालं असताना आता मात्र हा कॉमेडीचा शार्प शूटर 'सिरियल किलर' ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली यांचीनिर्मिती असलेलं ‘सिरियल किलर हे नवं नाटक प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. केदार देसाई लिखित दिग्दर्शित हे धमाल नाटक येत्या शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होणार आहे. यात भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्याच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत.

भाऊ कदम 'सिरियल किलर' (Serial Killer PR team)

टीव्ही मालिकांची अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेनं संशयाचं वातावरण तयार होतं. या घटनेनंतर 'सिरियल किलर' म्हणून आलेला खरंच 'सिरियल किलर' असतो की नसतो ? याचा धमाल खेळ रंगतो. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये गुंडाळून आलेला हा 'सिरियल किलर' काय धमाल उडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदाबरोबरच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं 'सिरियल किलर’ हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंद देईल’ असा विश्वास अभिनेता भाऊ कदम यानं यानिमित्तानं व्यक्त केला आहे. नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सनं केला आहे. ‘सिरियल किलर’च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली असून भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे.

नाटकासाठी नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी बनवलं असून विजय गवंडे यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. तर सूत्रधार सुनील पानकर गोट्या सावंत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details