महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 7:28 PM IST

ETV Bharat / entertainment

जस्मिन भसीननं अली गोनीसाठी धन्यवाद नोट केली शेअर, दृष्टी आल्यानंतर पहिली पोस्ट - JASMINE BHASIN and ALY GONI

Jasmine Bhasin Cornea Damage Update: जस्मिन भसीननं तिच्या प्रकृतीबाबत एक अपडेट शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला होता. त्यानंतर तिची दृष्टी गेली होती. दुसरीकडे तिचा बॉयफ्रेंड-अभिनेता अली गोनी यानेही फोटो शेअर करून त्याच्या 'लेडी लव्ह'ला प्रोत्साहन दिलंय

Jasmine Bhasin Cornea Damage
जास्मिन भसीन कॉर्निया नुकसान (अली गोनी-जस्मिन भसीन (फाइल फोटो) (Etv Bharat))

मुंबई - Jasmine Bhasin : टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन सध्या आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहे. 17 जुलै रोजी, तिच्या डोळ्याला इजा झाली होती. जस्मिननं रविवारी 21 जुलै तिच्या तब्येतीबद्दल माहिती शेअर केली होती. आज 22 जुलै रोजी तिनं एक धन्यवाद पोस्ट लिहिली आहे. पोस्टवर तिनं सुंदर कॅप्शन दिलंय. या पोस्टमधून तिनं आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं, "गेले काही दिवस मी खूप कठीण टप्प्यातून जात होते. मला खूप वेदना झाल्यानं वाईट वाटत होतं. या कठीण काळात अली गोनी 24 तास माझ्याबरोबर राहिला नाही, तो माझे डोळे बनला. मला हसवण्याचा आणि वेदना विसरण्याचा प्रयत्न तो करत होता. प्रत्येक क्षणी, माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद." याशिवाय अली गोनीनं देखील जस्मिनचा एक फोटो शेअर केला आहे.

जास्मिन भसीन कॉर्निया नुकसान (Aly Goni - instagram)

जस्मिन भसीननं शेअर केली पोस्ट : शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टमध्ये जस्मिनआणि अली यांच्यात एक खास बॉन्ड पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये असे अनेक क्षण आहेत, जे खूप सुंदर आहे. व्हिडिओमध्ये दोघेही व्हेकेशन, डिनर डेट आणि पार्टी करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत 'लेता जैजो रे' हे गाणे ऐकू येत आहे. जस्मिननं काही दिवसांपूर्वी तब्येतीबद्दलची अपडेट शेअर केली, यानंतर चाहत्यांनी तिच्या विषयी चिंता व्यक्त केली होती. तिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी अपलोड केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मी पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि बरी होत आहे. प्रेम आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद."

जास्मिन भसीन कॉर्निया नुकसान (Jasmine Bhasin - instagram)

जस्मिन भसीनच्या तब्येतीत सुधार :17 जुलै रोजी जस्मिन नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. ती लेन्स घालून कार्यक्रमाला गेली होती. यानंतर तिच्याबरोबर काय घटलं हे सांगत तिनं म्हटलं, "लेन्समध्ये काय समस्या होती माहीत नाही. माझ्या हळूहळू डोळ्यात दुखू लागले. नंतर हा त्रास वाढला. कार्यक्रमानंतर मी डॉक्टरांकडे गेले, तिथे त्यांनी मला सांगितलं की माझ्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झाले आहे. बरे होण्यासाठी 4-5 दिवस लागतील." आता जस्मिनची तब्येत बरी असल्यानं तिचे चाहते आनंदी आहेत. तिला काही चाहते स्वत:ची काळजी घेण्यास सांगताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. जस्मिन भसीनचा डोळ्याला झाली इजा, डोळ्यावर पट्टी बांधलेला फोटो व्हायरल - Jasmin Bhasin

ABOUT THE AUTHOR

...view details