ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या रायनं घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा ब्रेक लावला, पॅरिस फॅशन वीकमध्ये लग्नाची अंगठी आली चर्चेत - Paris Fashion Week 2024 - PARIS FASHION WEEK 2024

Aishwarya Rai Paris Fashion Week : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा एकदा ब्रेक लावला आहे. पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये ऐश्वर्यानं पती अभिषेक बच्चननं दिलेली अंगठी फ्लाँट केली. आता यानंतर या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवांना ब्रेक मिळाला आहे.

Aishwarya Rai Paris Fashion Week
ऐश्वर्या राय पॅरिस फॅशन वीक 2024 (अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Getty-ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 12:29 PM IST

मुंबई - Aishwarya Rai Paris Fashion Week: 'क्वीन ऑफ द रॅम्प' अशी ओळख असलेली हिंदी सिनेसृष्टीतील देखणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने 23 सप्टेंबर रोजी पॅरिस फॅशन वीकमध्ये तिच्या गॉर्जियस लूकने शोमध्ये उपस्थितांची मनं जिंकली. बलून-हेम रेड ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. मिस वर्ल्ड 1994 ची विजेती असलेल्या या सौंदर्यवतीच्या प्रत्येक हालचाली लोकांना आवडत असतानाच ऐश्वर्याच्या लग्नाच्या खासगी गोष्टींनी पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिनं आपल्या बोटात घातलेल्या अंगठीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याच्या अंगठीनं वेधलं सर्वाचं लक्ष : पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याच्या लग्नामधील अंगठीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी ऐश आपली अंगठी फ्लाँट करताना आणि प्रेक्षकांना फ्लाइंग किस देताना दिसली. ऐश्वर्या अनेक प्रसंगी ही अंगठी कॅरी करताना दिसली आहे. रिपोर्ट्सनुसार, सायमा 2024 पूर्वी तिच्या हातात अंगठी नव्हती. त्यामुळे घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या.काही दिवसांपूर्वी, पॅरिस फॅशन वीक सुरू होण्यापूर्वी, ऐश्वर्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, यामध्ये ती पुन्हा लग्नाची अंगठी परिधान केलेली दिसली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलीबरोबर होती. यादरम्यान देखील ती लग्नाची अंगठी फ्लाँट करताना दिसली.

पॅरिस फॅशन वीक 2024 मधील ऐश्वर्या राय बच्चनचं लूक : पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये ऐश्वर्या राय बच्चननं लाल रंगाच्या बलून-हेम रेड ड्रेससह केस मोकळे सोडले होते. बोल्ड रेड लिप शेडसह ऐश्वर्यानं या शोचं प्रतिनिधित्व केलं. तिनं अत्यंत आत्मविश्वासानं कॅट वॉक केला. आता तिचे या शोमधील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावर आता अनेकजण ऐश्वर्याचं कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी साऊथ चित्रपट 'पोन्नियिन सेलवन पार्ट- 2' या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटासाठी तिला सायमा 2024 (SIIMA 2024)मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) श्रेणीमधील पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :

  1. सायमा 2024मधील ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याचा व्हिडिओ पाहिल्यावर चाहत्यांनी केलं कौतुक - SIIMA 2024
  2. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्यानं न्यूयॉर्क व्हेकेशन केला एन्जॉय, मुंबई विमानतळावर झाल्या स्पॉट - aishwarya rai bachchan video
  3. ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या वयाच्या 13 व्या वर्षी झाली समजूतदार, पापाराझीला म्हटली 'ही' गोष्ट - AISHWARYA RAI

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.