नागपूर Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह हे मंगळवारपासून दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात महायुतीतील जागावाटपावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील जागावाटपाबाबत होणार चर्चा : लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपाला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही तीच परिस्थिती कायम राहील, अशी भीती भाजपाच्या नेत्यांना वाटू लागल्यानं भाजपाने विदर्भाकडं लक्ष केंद्रित केलंय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धेचा दौरा केला होता. त्यानंतर आता लगेच गृहमंत्री अमित शाह विदर्भातील भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दौऱ्यावर आहेत.
मोदींचा लवकरच वाशिम दौरा : अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यात महायुतीतील जागावाटपाच्या संदर्भात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वाशिम जिल्हा दौरा करणार आहेत. "लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपयश आलं, पण त्याच्यातुन मार्ग काढण्यासाठी अमित शाह दौऱ्यावर आलेत," असं भाजपा नेते आशिष देशमुख यांनी सांगितलं.
🕝 2.30pm | 24-9-2024📍Nagpur | दु. २.३० वा. | २४-९-२०२४📍नागपूर.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 24, 2024
🪷 Along with our karyakartas, extended a warm welcome to our leader, Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah as he arrives in Nagpur.
🪷 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह… pic.twitter.com/IaUMYPfEG5
अमित शाहांनी घेतला आढावा : अमित शाह यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये भाजपाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या सर्व विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तसंच भाजपाच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून त्यांच्या जिल्ह्यात व मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर केलेल्या कामांची माहिती जाणून घेण्यात आली. प्रतिकूल असलेल्या बूथवर केलेली कामं, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांशी संपर्क याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती अमित शाह यांनी घेतली.
हेही वाचा
- राज ठाकरे पोहोचले चक्क सलमान खानच्या घरी; नेमकं कारण काय? - Raj Thackeray meet Salman
- लोहगाव विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव; जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर निर्णय - Cabinet Decision
- सुप्रिया सुळेंनी 'त्या' कार्यक्रमाला जायला नको होतं; मंत्री मुश्रीफांची समरजीत घाटगेंवर टीका - Hasan Mushrif
- महायुती, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच; आजी-माजी नव्हे तर नवख्यांचीही नावं चर्चेत - Vidhan Sabha Election 2024