हैदराबाद Cricket Match Haulted : पाऊस किंवा खराब हवामानामुळं सहसा क्रिकेट सामने थांबवावे लागतात. पण बऱ्याचदा विचित्र कारणांमुळं देखील सामना विस्कळीत होतो. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बीग बॉश लीगमधील एक सामना मैदानात आग लागल्यानं थांबवावा लागला होता. यापुर्वी मधमाश्या, सूर्यप्रकाश आणि गाड्या मैदानात आल्यानं क्रिकेट सामने थांबवावे लागले आहेत.
मधमाशीमुळं थांबला क्रिकेट सामना : मधमाश्यांमुळं क्रिकेट सामन्यांमध्ये अनेक वेळा ब्रेक लागले आहेत. पण 2017 जोहान्सबर्ग इथं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात, सामना अंतिम टप्प्यात असताना आणि श्रीलंकेसाठी विजय आवश्यक असताना मधमाश्यांनी हल्ला केला. श्रीलंकेचा स्कोअर 8 बाद 194 धावांवर होता, तेव्हा अचानक मधमाश्यांच्या झुंडीनं मैदानावर हल्ला केला. यानंतर एकूण 65 मिनिटांच्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा सुरु झाला.
मैदानावर कार आल्यानं थांबला सामना : तसंच 2017 मध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी सामना थांबवावा लागला कारण एक माणूस कार घेऊन थेट मैदानावर पोहोचला. त्या माणसानं सांगितलं की त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिसली नाही आणि तो चुकून मैदानात घुसला. त्यानं खेळाडू आणि पंचांच्या शब्दांकडेही दुर्लक्ष केलं आणि त्याची गाडी घेऊन थेट मैदानावर पोहोचला. चांगली गोष्ट म्हणजे खेळपट्टीला कोणतेही नुकसान झालं नाही आणि सामनाधिकारींनी खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य असल्याचं मानलं आणि सामना पुन्हा सुरु झाला.
सूर्यप्रकाशामुळं थांबवावा लागला खेळ : पावसामुळं सर्वाधिक व्यत्यय येणारा खेळ सूर्यप्रकाशामुळे थांबवावा लागतो हे आश्चर्यकारक आहे. पण 2021 मध्ये नेपियरमधील मॅकलीन पार्क इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना चक्क उन्हामुळं थांबवावा लागला. या सामन्यात भारत एका छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि सूर्यप्रकाश थेट शिखर धवनच्या डोळ्यात पडत होता. त्यानं याबद्दल पंचांकडे तक्रार केली. यानंतर सामना थांबवण्यात आला.
Play was delayed at The Gabba when a fire broke out in the stands. #BBL14 pic.twitter.com/v2J2OktfuF
— KFC Big Bash League (@BBL) January 16, 2025
मैदानात आग लागल्यानं थांबला सामना : ऑस्ट्रेलियात नुकतीच झालेली T20 स्पर्धा, बिग बॅश लीगमध्ये सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लागल्यानं एक भयानक घटना घडली. 16 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामन्यादरम्यान, प्रसिद्ध ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये अचानक आगीच्या ज्वाळा उठू लागल्या, ज्यामुळं तिथं भीतीचं वातावरण निर्माण झालं. यामुळं सामनाही काही काळ थांबवावा लागला, तर जवळ बसलेल्या प्रेक्षकांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. तथापि, आगीचं भीषण रुप धारण होण्यापासून रोखण्यात आलं आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, ही दिलासादायक बाब होती.
हेही वाचा :