ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो रिलीज, घरातील सदस्यांना 'बिग बॉस'च्या घोषेनंतर वाटली भीती - bigg boss marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये 'बिग बॉस' एक घोषणा करताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 2:03 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चं यंदाचा सीझन हा सुपरहिट झाला आहे. 'बिग बॉस'च्या घरात यावर्षी वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री मिळून एकूण 17 सदस्य सहभागी झाले होते. हा शो 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दरम्यान बिग बॉसच्या घरात फक्त 8 सदस्य राहिले आहेत. यांच्यामध्ये ट्रॉफी कोण जिंकणार, याबद्दल अनेकजण सोशल मीडियावर अंदाज लावताना दिसतात. या 8 सदस्यमध्ये आता जोरदार टक्कर घरामध्ये पाहायला मिळणार आहेत. सोमवारपासून 'बिग बॉस'च्या घरात नवव्या आठवडा सुरुवात झाला आहे. 'बिग बॉस मराठी'चा पाचव्या सीझन आता अंतिम सोहळ्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

'बिग बॉस'चा नवीन प्रोमो रिलीज : आता घरात नॉमिनेशन टास्कचीही सुरुवात झाली आहे. दरम्यान घरात रंगत आणण्यासाठी 'बिग बॉस' खूप प्रयत्न करताना दिसत आहे. घरात नॉमिनेशन टास्कदरम्यान काही स्पर्धकांनी एकमेकांना नॉमिनेट केलंय. याशिवाय काही स्पर्धकांनी आपापल्या जवळच्या लोकांचीही नावे घेतली आहेत. आता 'बिग बॉस' घरात आणखी एक नवीन टास्क घेऊन येत आहे. या टास्कमध्ये 'बिग बॉस' घरातील सदस्यांनाच एकमेकांची कामे करायला सांगणार आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस असं म्हणतात की, "या आठवड्यात आपल्यातील काही सदस्ये सांगकामे ठरणार आहेत आणि उर्वरीत सदस्य असतील ते त्यांचे मालक, म्हणजेच मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामे सुद्धा त्यांना करावी लागतील."

घरातील सर्व सदस्य नॉमिनेट: आता व्हायरल झालेल्या प्रोमोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. घरातील कोणते सदस्य कोणत्या सदस्यांची वैयक्तिक कामे करणार हे पाहण्यासाठी आता अनेकजण आतुर आहेत. या आठडव्यात घरातून बाहेर जाण्यासाठी आठही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यावेळी कोण जाणार हे पाहणं देखील लक्षणीय ठरणार आहे. त्याशिवाय घरातील कोणते सदस्य कोणत्या सदस्यांची वैयक्तिक कामे करणार आहेत? हे पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान 'बिग बॉस मराठी 5'च्या सीझननं आतापर्यंत 50 हून अधिक दिवसांचा टप्पा पार केला आहे. हा सीझन कोण जिंकेल हे काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मधून अरबाज पटेल घरातून गेल्यानंतर सूरज चव्हाणनं दिला निक्की तांबोळीला पाठिंबा - bigg boss marathi
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये पंढरीनाथ कांबळेनं वर्षा उसगावकरला कॅप्टन्सी टास्कदरम्यान चांगलच सुनावलं, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi 5
  3. अरबाज पटेल-संग्राम चौगुलेमध्ये होणार राडा, कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो व्हायरल - bigg boss marathi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.