मुंबई - Laapataa Ladies: सोशल ड्रामा फिल्म 'लापता लेडीज' 97 व्या अकादमी पुरस्कार 2025 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं 'लापता लेडीज' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.'लापता लेडीज' 1 मार्च 2024 रोजी प्रसारित करण्यात आला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन केलंय. 'लापता लेडीज'सह 29 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते. मात्र यावर खूप विचार करून 'लापता लेडीज'ला ऑस्करसाठी पाठविण्यात आलंय. ऑस्करला पाठण्यासाठी 'ॲनिमल', 'कल्की 2898 एडी', 'थंगलान', 'श्रीकांत' आणि अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता. आता 'लापता लेडीज'ला कुठल्या कारणामुळे ऑस्करला पाठविण्यात येणार? याचे कारण जाणून घेऊ.
'लापता लेडीज'ची ऑस्करसाठी निवड का झाली? : आसामचे दिग्दर्शक जह्नू बरुआ हे ऑस्करमध्ये 'लापता लेडीज'च्या अधिकृत प्रवेशासाठी 12 सदस्यीय ज्युरीचे अध्यक्ष आहेत. 'लापता लेडीज'बाबत त्यांनी नुकतीच चर्चा केली होती. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, ऑस्करसाठी 'लापता लेडीज'ला का पाठवले? यावर त्यांनी उत्तर दिलं, " या 29 चित्रपटांपैकी ज्युरी ऑस्करच्या माध्यमातून भारताला प्रत्येक दृष्टीकोनातून जगासमोर मांडू शकेल, अशा चित्रपटाच्या शोधात होती. 'लापता लेडीज' या सर्व गोष्टीमध्ये पूर्ण आहे. हा चित्रपट भारतीचं प्रतिनिधित्व करू शकतो. त्यामुळे 'लापता लेडीज' ही योग्य निवड आहे."
'लापता लेडीज' करेल भारताचं प्रतिनिधित्व : यानंतर त्यांनी पुढं म्हटलं, "भारताला जागतिक स्तरावर मांडता येईल, असा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या 29 चित्रपटांपैकी फक्त 'लापता लेडीज'ला ज्युरी सदस्यांनी मान्यता दिली. हे सर्व चित्रपट आपण एका आठवड्यात चेन्नईमध्ये पाहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. या संपूर्ण आठवड्यात आम्ही सर्व चित्रपटांवर चर्चा केली. चर्चेनंतर आम्ही त्यांचा अभ्यास केला. नंतर काही चित्रपट शॉर्टलिस्ट केले. यावेळी, कोणत्या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवायचं यावर चर्चा करण्यासाठी अर्धा दिवस जास्त लागला. त्यानंतर 'लापता लेडीज'बाबत खात्री झाली. आपल्यावर आणि ज्युरीवर कोणत्याही प्रकारचे दडपण नाही."
काय आहे 'लापता लेडीज'ची कहाणी? : 'लापता लेडीज' हा एक सोशल ड्रामा चित्रपट आहे. लहान वयातच मुलींची लग्ने कशी लावून दिली जातात? जबाबदाऱ्यांसह घराच्या चार भिंतीत कोंडून ठेवल्याचं यात दाखवण्यात आलंय. चित्रपटात शिक्षण घेऊ इच्छिणारी मुलगी लग्नाच्या विरोधात असते. मात्र तिचे जबरदस्तीनं लग्न लावून दिले जाते. माहेरचा निरोप घेऊन ती सासरच्या घरी जात असते. तेव्हा तिच्यासारखीच दुसरी नवरीही ट्रेनमध्ये बसलेली असते. या दुसऱ्या नवरीला सासरच्या घरी जाण्याचा आनंद होत असतो. यानंतर कथेत ट्विस्ट येतो, जेव्हा या नववधूंची अदलाबदल होते. यानंतर काय होते? या चित्रपटात पाहा. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
हेही वाचा :
- रवी किशनने उलडले 'लापता लेडीज'मधील इन्स्पेक्टरच्या भूमिकेचे रहस्य - Laapataa Ladies Oscar entry
- ऑस्कर २०२५ च्या शर्यतीत 'लापता लेडीज'ने भारतीय सिनेसृष्टीतील २८ चित्रपटांना टाकले पिछाडीवर - Lapata Ladies nominated for Oscars
- ऑस्कर एंट्रीसाठी उत्कृष्ट 29 चित्रपटातून वर्णी लागणं हा बहुमान, किरण रावनं व्यक्त केली कृतज्ञता - Laapataa Ladies Entry in Oscars