ETV Bharat / state

"अक्षय शिंदे एन्काऊंटर संपूर्णपणे फेक तसेच स्क्रिप्टेट; कोर्टात जाणार" - Akshay Shinde Encounter - AKSHAY SHINDE ENCOUNTER

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडीमार करत, या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केलाय.

Akshay Shinde Encounter
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 5:36 PM IST

पुणे Akshay Shinde Encounter : बदलापूरात चिमुकल्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे या नराधमाचं ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केलं. आता या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून या एन्काउंटर प्रकरणावर शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टात जाणार : "अक्षय शिंदे हा काही समाजसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ता नव्हता तर तो नराधाम होता. त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु, ज्या पद्धतीनं त्याचा एन्काऊंटर करण्यात आला तो संपूर्णपणे फेक तसेच स्क्रिप्टेट होता. अक्षय शिंदे प्रकरणात आम्ही कोर्टात जाणार आहोत," अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सरकारवर टीका केली.

प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे (ETV Bharat Reporter)

अक्षयला पिस्तूलचं लॉक कसं काढता आलं? : "या प्रकरणात पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून जो तपास करण्यात आला तो संथगतीने होता. सोमवारी आरोपी शिंदेला जेव्हा बदलापूर येथे घेऊन जाण्यात आलं तेव्हा त्याला वेगळ्या मार्गानं का नेण्यात आलं? हे संशयास्पद आहे. तसेच पोलिसांकडून चार्जशीट रविवारी का फाईल केली? तसेच ज्या पिस्तूलनं अक्षयवर गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. अक्षय शिंदेला पिस्तूलचं लॉक कसं काढता आलं? तसंच दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढू शकतो?" असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचं यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

तो एवढा हुशार कसा निघाला? : सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय. अक्षय शिंदे हा गतिमंद होता, असं पोलिसांनी सांगितलं असताना तो एवढा हुशार कसा निघाला? तसेच संजय शिंदे हे वादग्रस्त पोलीस अधिकारी असून विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हात होता. प्रदीप शर्मा यांचा तो जवळचा होता. पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचं निलंबन व्हायला पाहिजे. या प्रकरणाची न्यायधीशांच्या समितीकडून चौकशी व्हायला पाहिजे. तसंच अक्षय शिंदेला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नसून यातून कोणाला वाचवलं जातंय? याचा तपास झाला पाहिजे."

हेही वाचा -

  1. नोकरीच्या अमिषानं घेतले तरुणाचे कागदपत्रं; बँक खाते काढून 380 कोटी रुपयाचा गोलमाल; भामट्यांविरोधात गुन्हा - Fraud with Youth For Given Job Lure
  2. बदलापुरातल्या चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर; गृह विभाग संशयाच्या भोवऱ्यात - akshay shinde encounter
  3. अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टर प्रकरणाची सीआयडी करणार चौकशी - Akshay Shinde encounter

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.