मुंबई - 'BAFTA Awards 2024' :लंडनमध्ये बाफ्टा अवॉर्ड्स म्हणजेच ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्सचे आयोजन 18 फेब्रुवारीला करण्यात आलं होतं. यावर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण या पुरस्कार सोहळ्यात प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी झाली असून तिने दुआ लीपा आणि डेव्हिड बेकहॅम सारख्या सेलिब्रिटींबरोबर स्टेज शेअर केला आहे.
'बाफ्टा अवॉर्ड्स 2024'चे पुरस्कार जाहीर : बाफ्टा 2024च्या अवार्ड शोमध्ये 'ओपेनहाइमर'ला 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले, त्यापैकी 7 मध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाला. याशिवाय बाफ्टा अवॉर्ड्समध्ये 'पुअर थिंग्स'नं 5 श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून'ला नऊ नामांकन मिळाले होते. तसेच ब्रैडली कूपर स्टारर 'मेस्ट्रो'ला सात नामांकन मिळाले होते. याशिवाय 2023 मधील सर्वात मोठे बॉक्स ऑफिस चित्रपट, 'ग्रेटा गेरविग'च्या 'बार्बी'ला एकही पुरस्कार मिळाला नाही. 'बाफ्टा अवॉर्ड्स 2024' यादी तुम्ही खाली पाहू शकता.
पाहा बाफ्टा पुरस्कार 2024 संपूर्ण विजेत्यांची यादी-
सर्वोत्कृष्ट चित्रपट - ओपनहेमर (क्रिस्टोफर नोलन, चार्ल्स रोव्हन, एम्मा थॉमस)
उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट - द झोन ऑफ इंट्रस्ट
प्रमुख अभिनेता- सिलियन मर्फी
प्रमुख अभिनेत्री - एम्मा स्टोन (पूअर थिंग्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - 'द होल्डओवर्स' (डिव्हाईन जॉय रँडॉल्फ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ट डाउनी, जुनियर (ओपेनहायमर)