मुंबई -Bade Miyan Chote Miyan :हिंदी चित्रपटसृष्टीचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपटामध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, आलिया इब्राहिम, सोनाक्षी सिन्हा, पृथ्वीराज सुकुमारन, जान्हवी कपूर, जुगल हंसराज आणि इतर कलाकार दिसणार आहेत. दरम्यान 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे ॲक्शन सीन काल्पनिक न राहता खरे वाटण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील स्टंटवर झाला खूप खर्च : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या स्टंट सीन्सवर बराच खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक स्टंटवर बारकाईनं काम केलं गेलं आहे. अली अब्बास जफरनं या चित्रपटाबद्दल सांगताना म्हटलं, ''चित्रपटाच्या स्टंट सीन्सवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांवर नेहमीच बजेटबद्दल मोठा दबाव असतो. जेव्हा तुम्हाला काही तरी चांगलं दाखवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला छोटा जरी स्टंट करायचा असे तर 4 लाख रुपये खर्च करावे लागतात. स्टंट चुकला तर चार लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. असे अनेक स्टंट्स आहेत, ज्याची किंमत 3-4 कोटी रुपये होती. त्यात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंच्या किंमती खूप महाग होत्या. ''