मुंबई - Ayushmann and Rashmika : दिनेश विजन हे हॉरर कॉमेडी चित्रपट बनवण्यासाठी पारंगत आहे. त्यांनी 2018मध्ये 'स्त्री'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. या हॉरर कॉमेडी चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी 'भेडिया' आणि 'मुंज्या'बरोबर स्वतःचे हॉरर कॉमेडीचे विश्व निर्माण केलं. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावबरोबर 'स्त्री 2' यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान या विश्वात ते 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर' या चित्रपटाची भर घालणार आहेत. दिनेश विजन 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर'साठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदारबरोबर पुन्हा एकत्र येत आहेत.
आयुष्मान खुराना-रश्मिका मंदान्ना दिसेल एकत्र : रिपोर्ट्सनुसार, दिनेश विजन आणि आदित्य सरपोतदार यांनी व्हॅम्पायर्सवर आधारित या हॉरर कॉमेडीमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची निवड केली आहे. आयुष्मान खुराना आणि दिनेश विजन यांनी यापूर्वी 'बाला' चित्रपटात एकत्र काम केलं आहे. विजन हे गेल्या काही दिवसांपासून 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर'बद्दल बोलताना दिसत होते. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट फ्लोअरवर येण्यास सज्ज आहेत. 'मुंज्या'च्या यशानंतर दिनेश विजन आणि आदित्य सरपोतदार यांचा दुसरा एकत्रित चित्रपट असणार आहे.