महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केलं 'हे' आवाहन - Ashok Saraf - ASHOK SARAF

Ashok Saraf Casts his Vote : मुंबईतील सहा मतदारसंघात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. यात हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतीव अनेक कलाकारांनी देखील मतदानाला हजेरी लावली. तसंच महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ओशिवारा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावलाय.

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केलं 'हे' आवाहन
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केलं 'हे' आवाहन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 5:52 PM IST

मुंबई Ashok Saraf Casts his Vote : देशभरात आज पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातही 13 मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय तर हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटी देखील उत्स्फूर्तपणे मतदानाला मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान करीत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय.

काय म्हणाले अशोक सराफ : मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. त्यासोबत हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील मतदानाला हजेरी लावली. यातच महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ओशिवारा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावलाय. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "मतदानासाठी जर बघितलं असेल तर मतदान केंद्रावर लोक छान प्रकारे गर्दी करत आहेत. भविष्याच्या दृष्टिकोनातून ही चांगली गोष्ट आहे. जे कोणी मतदान करण्यापासून वंचित राहिले आहे, त्यांनी आता देखील घराबाहेर पडून मतदानाला यावं" असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसंच राजकारणात कोणताही रस नाही आणि त्यात मला काही समजत नाही आपण राजकारणात पडत नाही. मात्र, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा माणूस खासदार असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

आशा भोसले यांनीही केलं मतदान : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांची नात झनई भोसलेंसह मतदानाचा हक्क बजावलाय. तसंच यावेळी त्यांनी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावं. तसंच योग्य उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलंय.

सर्व सेलिब्रिटींनी केलं मतदान : आज मुंबईत सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठ्या संख्येनं बॉलिवूड सेलेब्रिटी मतदान करत आहेत. यात ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र, अभिनेत्री खासदार हेमा मालिनी, जावेद अख्तर, शबाना आझमी, राहुल बोस, परेश रावल, विद्या बालन, अक्षय कुमार, फरहान अख्तर, जान्हवी कपूर, कैलाश खेर, शाहिद कपूर, रणदीप हुडा, राजकुमार राव, सुनिल शेट्टी यांनी मतदान केलं आहे. तसंच मतदानानंतर सर्वांनीच लोकशाहीच्या या उत्सवात सामील होण्याचं आवाहन केलंय.

हेही वाचा :

  1. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या 'पंजा'ला केलं मतदान; म्हणाले... - Lok sabha election
  2. "मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हावी", परेश रावलची प्रतिक्रिया: दिग्गज सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - LOK SABHA ELECTION 2024

ABOUT THE AUTHOR

...view details