महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी यामीच्या 'आर्टिकल 370' ने विद्युतच्या अ‍ॅक्शनर 'क्रॅक'ला मागे टाकले - Yami Gautam

Article 370 Vs Crakk Box Office : यामी गौतमच्या आर्टिकल 370 ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर विद्युत जामवालच्या क्रॅकला मागे टाकले आहे. यामीचा चित्रपट जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर भाष्य करतो, तर विद्युत स्टारर चित्रपट एक अ‍ॅक्शनथ्रिलर आहे. दोन्ही चित्रपट २३ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर दाखल झाले होते.

Article 370 Vs Crakk Box Office
आर्टिकल 370 विरुद्ध क्रॅक बॉक्स ऑफिस कलेक्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 10:59 AM IST

मुंबई - Article 370 Vs Crakk Box Office : 23 फेब्रुवारी रोजी यामी गौतमचा आर्टिकल 370 आणि विद्युत जामवालचा क्रॅक हे दोन नवीन चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झाले. जरी हे चित्रपट वेगवेगळ्या शैलीतील असले तरी, चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करत आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सॅनन स्टारर तेरी बातों में ऐसा उल्झा जिया चित्रपटाचा प्रतिसाद कमी झाल्यानंतर या नवीन रिलीज झालेल्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चमकण्याची संधी आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या बॉक्स ऑफिस ट्रेंडनुसार, सुरुवातीच्या दिवशी, आर्टिकल 370 ने क्रॅकला मागे टाकले आहे.

कलम ३७० बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १: यामी गौतमच्या आर्टिकल 370 चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. या चित्रपटाने अंदाजे 5.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर निर्मित, हा चित्रपट जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर केंद्रित आहे. प्रदेशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कट्टरपंथींविरुद्ध लढणाऱ्या एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका यामीने साकारली आहे.

यामी शिवाय आर्टिकल 370 मध्ये प्रियमणी, किरण करमरकर आणि अरुण गोविल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आदित्य धर, यामीचा पती आणि चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे.

क्रॅक: जीतेगा ते जियेगा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1: विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शन-पॅक थ्रिलर क्रॅकनेही आश्वासक सुरुवात केली आहे. या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी सुमारे 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित या चित्रपटाची कथा मुंबईतील झोपडपट्टीपासून सुरुवात करणाऱ्या क्रिडा जगतातील साहसी तरुणाची गोष्ट आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि अ‍ॅक्शनहिरो फिल्म्स आणि पीझेड पिक्चर्स निर्मित, ट्रेलर लाँचच्या वेळी, विद्युत जामवालने भारतीय चित्रपटातील सर्वात मोठा स्पोर्ट्स अ‍ॅक्शनथ्रिलर देण्याचे उद्दिष्ट ठेवून या चित्रपटासाठी आपली दृष्टी व्यक्त केली होती. क्रॅकमध्ये अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि एमी जॅक्सन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची सह्याद्री वाहिनीवर आजपासून पर्वणी
  2. 'जिगरा'चे शूटिंग आटोपून आलिया भट्ट भारतात परतली, ऑल-ब्लॅक आउटफिटमध्ये विमानतळावर झाली स्पॉट
  3. दिवंगत 'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या पालकांची भेट घेऊन आमिर खानने केले सांत्वन

ABOUT THE AUTHOR

...view details