मुंबई - Arjun kapoor And Malaika Arora :हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यापैकी एक अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असतात. आता अर्जुन आणि मलायका यांचं नाते कुणापासून लपलेले नाही आणि दोघेही अनेकदा एकत्र बाहेर जाताना दिसत असतात. काही दिवसापूर्वी या जोडप्याच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र या कपलमध्ये आता सर्व काही ठिक आहे. आता अर्जुन आणि मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये हे कपल कारमध्ये एकत्र दिसत आहे. अर्जुन हा गर्लफ्रेंड मलायका अरोराला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. दरम्यान अर्जुन कपूरच्या चाहत्यांना त्याची ही स्टाईल खूप आवडली आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा व्हिडिओ व्हायरल : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे जोडपे अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान हे जोडपे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कारमध्ये बसलेले आहे. यानंतर मलायका कारमधून बाहेर उतरून तिच्या अपार्टमेंटच्या दिशेला जात आहे. आता अनेकजण अर्जुन कपूरला परफेक्ट बॉयफ्रेंड असल्याचं म्हणत आहेत. मलायका 'झलक दिखला जा' या शोमध्ये असताना तिच्यासाठी अनेकदा अर्जुन कपूरच्या घरून जेवन येत होतं, असं अनेकदा तिनं सांगितलं आहे.