महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विराटच्या डोळ्यात पाणी आल्यावर मुलगी वाल्मिकाला काय सांगितलं? अनुष्का शर्मानं शेअर केली पोस्ट - Anushka Sharma Shares post - ANUSHKA SHARMA SHARES POST

T20 World Cup 2024 and Anushka sharma : अभिनेत्री अनुष्का शर्मानं आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर पती विराट कोहलीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. क्रिकेटचा सामना पाहताना मुलीसह तिची मनस्थिती कशी होती, ही गोष्ट अनुष्का शर्मांना सोशल मीडियावर शेअर केली.

T20 World Cup 2024 and Anushka sharma
टी 20 विश्वचषक 2024 आणि अनुष्का शर्मा (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 12:36 PM IST

Updated : Jun 30, 2024, 1:07 PM IST

मुंबई - T20 World Cup 2024 and Anushka sharma : आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात चुरशीची लढत झाली. भारतीय क्रिकेट संघानं साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यात विराट कोहलीचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. टी-20 विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान एकामागून एक विकेट पडत असताना त्यानं संघाची धुरा सांभाळली होती. भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं पती विराट कोहली आणि मुलगी वामिकाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. अनुष्कानं आपल्या मनातील भावना चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.

अनुष्का शर्मानं केली भावूक पोस्ट शेअर :अनुष्का शर्मानं विजयानंतर ट्रॉफी उचलताना आणि भावूक झालेल्या खेळाडूंचे फोटो पोस्ट केले. तिन कॅप्शनमध्ये लिहिलं, " जेव्हा आमच्या मुलीनं त्याला (विराट कोहली) टीव्हीवर रडताना पाहिलं, तेव्हा तिला सर्वात मोठी चिंता होती. सगळे त्याला का मिठी मारत आहेत? मी तिला सांगितलं की त्याला दीड अब्ज लोकांनी प्रेम दिलं आहे. किती आश्चर्यकारक विजय आहे? चॅम्पियन्सचं अभिनंदन." यानंतर अनुष्कानं माजी कर्णधार विराट कोहलीचा दुसरा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली हातात विश्वचषक ट्रॉफी धरून भारतीय तिरंगा घेतलेला दिसत आहे. जवळपास 30 लाख लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "माझे या व्यक्तीवर खूप प्रेम आहे. मी खूप भाग्यवान आहे की, मी तुला माझे कुटुंब म्हणू शकते. आता हे साजरे करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग पाण्याचा ग्लास घेऊन ये!"

विराटनं क्रिकेटमधून घेतली निवृत्ती : अनुष्का शर्मानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर क्लार्कसनच्या डिसमिसचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिनं तिच्या टीव्हीवरून क्लिक केला आहे. जेव्हा संपूर्ण देश सामना पाहत होता. तेव्हा अनुष्का शर्म देखील तिच्या मुलीबरोबर संपूर्ण वेळ स्क्रीनवर लक्ष ठेवून होती. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिका आपल्या वडिलांना क्रिकेटच्या मैदानावर पाहून खूप आनंदी झाली. याची काही झलक याआधीच चाहत्यांसमोर आली आहे. या जोडप्यानं नेहमी पापाराझींना त्यांच्या मुलीची गोपनीयता राखण्याची विनंती केली आहे. विराटनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं त्याचे अनेक चाहते नाराज आहेत.

हेही वाचा :

  1. सेलिब्रिटींकडून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव, पहा कोण काय म्हणाले? - INDIA T20 WORLD CUP WIN
  2. 'कल्की 2898 एडी'च्या भाग 2ची शूटिंग 60 टक्के पूर्ण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक - kalki 2898 ad part 2
  3. मुकेश आणि नीता अंबानी यांनी वंचित जोडप्यांसाठी आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा - Mukesh and Nita Ambani
Last Updated : Jun 30, 2024, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details