महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस ओटीटी 3'चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज - anil kapoor first look - ANIL KAPOOR FIRST LOOK

bigg OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी 3' हा शो सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता अनिल कपूर या शोला होस्ट करणार आहे. जीओ सिनेमानं एक पोस्ट शेअर करून अनिल कपूरचe फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

bigg OTT 3
बिग बॉस ओटीटी 3 (अनिल कपूर (IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 3:42 PM IST

मुंबई - bigg OTT 3: लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस OTT 3'ची तारीख आज 6 जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. तसेच 'बिग बॉस ओटीटी 3'चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. यापूर्वी 31 मे रोजी या शोचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला होता. 'बिग बॉस ओटीटी 3' सलमान खान होस्ट करणार नसल्याचं समोर आलं आहे. सलमान खान हा सध्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन 1' करण जोहर,' बिग बॉस ओटीटी 2' सलमान खाननं होस्ट केला होता. आता 'बिग बॉस ओटीटी 3' अनिल कपूर होस्ट करणार असून आता या शोबद्दल खूप चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

अनिल कपूर फर्स्ट लूक रिलीज : 'बिग बॉस OTT 3'बद्दल पोस्ट शेअर करताना जीओ सिनेमानं 'बिग बॉस ओटीटी 3'चे नवीन होस्ट अनिल कपूरची ओळख करून देताना लिहिलं, "चित्रपटांवर राज्य केल्यानंतर, तो आता बिग बॉसवर राज्य करेल, अनिल कपूर खूप विशेष आहे, 21 जूनपासून शो सुरु होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी 3' पाहण्याचे साक्षीदार व्हा. हा शो 8 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणार आहे." 'बिग बॉस ओटीटी'चा ओपनिंग सीझन करण जोहरनं होस्ट केला होता त्यावेळी टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवालनं हा शो जिंकला होता. 'बिग बॉस ओटीटी 2 'चा विजेता हा युट्युबर एल्विश यादव जिंकला होता. 'बिग बॉस ओटीटी 2' गेल्या वर्षी 17 जून 2023 रोजी सुरू झाला. 'बिग बॉस ओटीटी 2' हा सीझन 57 दिवस चालला. आता 'बिग बॉस ओटीटी 3'ला लोकांकडून प्रेम मिळेल की नाही हे येणाऱ्या काळात समजेल. निर्मात्यांनी अद्याप 'बिग बॉस ओटीटी 3'च्या स्पर्धकांची नावे उघड केलेली नाही, मात्र यावेळी अंदाज लावला जात आहे की शोमध्ये काही टीव्ही स्टार्स आणि युट्युबर दिसले.

शोमध्ये कोण दिसणार?

आशीष शर्मा

सिंगर नवजीत सिंह

जतिन तलवार

रॅपर आरसीआर

निधि तलवार

खुशी पंजाबन

ABOUT THE AUTHOR

...view details