महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत अंबानीच्या समारंभातील हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंगचा दमदार डान्स व्हिडिओ व्हायरल - anant ambani wedding - ANANT AMBANI WEDDING

Hardik pandya and ranveer singh : अनंत अंबानीच्या हळदी समारंभात हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंग जोरदार डान्स केला होता. आता त्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Hardik pandya and ranveer singh
हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंग (अनंत अंबानी-राधिका मर्चेंट (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 12:56 PM IST

मुंबई - Hardik pandya ranveer singh : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे व्हिडिओ आता देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नानंतरचे काही कार्यक्रम सुरूच आहेत. लग्नानंतरच्या कार्यक्रमात देखील बॉलिवूड स्टार्स सहभागी होताना दिसत आहेत. अनेकजण नवीन जोडप्याचं अभिनंदन करत आहेत. इतकेच नाही तर राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची सोशल मीडियावर सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंग एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही सुपर एनर्जेटिक फॉर्ममध्ये दिसत आहेत.

हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल :सोशल मीडियावर या दोघांची जोडी आता जबरदस्त असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. या दोघांच्या फनी डान्सचं आता सर्वत्र कौतुकही होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभातील आहे. व्हिडिओत हार्दिक पटकन शूज काढतो आणि डान्स करायला पुढे येतो . यानंतर रणवीर सिंगही पुढे येऊन डान्स करतो. रणवीर आणि हार्दिकनं गुजराती गाण्यावर गरबा सादर केला. एवढेच नाही तर दोघेही यावेळी खूप उड्या मारताना दिसले. गायक राहुल वैद्य आणि गुरदीप मेहंदी यांनाही या दोघांबरोबर डान्स केला.

हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंगचा डान्स : दोघांचा हा जोशपूर्ण डान्स अनेकजण खूप उत्सुकतेनं पाहात होते. याशिवाय, आणखी एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात 'आजा सोनिये' गाणे ऐकल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंग स्टेजवर चढतात आणि ढोल वाजवायला सुरुवात करतात. यादरम्यान दोघेही तेथे ठेवलेली फुले उचलून लोकांवर फेकतात. एका व्यक्तीनं कमेंट सेक्शनमध्ये लिहिल की, "अंबानी कुटुंब इतके उत्साहित नाही, दोघेचं किती डान्स करत आहे." आणखी एका व्यक्तीनं लिहिलं की, "हार्दिक ऑन फायर." आणखी दुसऱ्यानं लिहिलं, "हा कसला माकड डान्स आहे." दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही अनेकजण म्हणत आहेत.

हेही वाचा :

  1. अनंत-राधिकाच्या लग्नात आलेल्या वऱ्हाडींची नीता अंबानींनी मागितली माफी; 'हे' आहे कारण - Anant Radhika Wedding
  2. अनंत-राधिका यांचं हनिमून डेस्टिनेशन ठरलं! पण प्लॅन... - Anant Ambani and Radhika Merchant
  3. अनंत अंबानींच्या लग्नाला नयनताराची हजेरी, कॅप्टन कूलसह साक्षीबरोबरचा फोटो केला शेअर - NAYANTHARA NEWS

ABOUT THE AUTHOR

...view details